Wed, Apr 24, 2019 16:24होमपेज › Kolhapur ›  भेटलेल्या प्रत्येक शिक्षकाचा ऋणी : प्रथमेश मनोहर दिंडे

 भेटलेल्या प्रत्येक शिक्षकाचा ऋणी : प्रथमेश मनोहर दिंडे

Published On: Sep 05 2018 10:11AM | Last Updated: Sep 05 2018 10:11AMमी केर्ली माध्यमिक विद्यालय या शाळेत शिकलो. आईवडील हे आपले पहिले गुरु तर दुसरे म्हणजे शाळेतील शिक्षक हे मला या शाळेत आल्यावर कळालं. या शाळेने मला खूप काही दिलं. नवीन मित्र मैत्रिणी, चांगले शिक्षक तसेच खूप आठवणींचा संग्रह मला दिला. मुख्याध्यापक ए. बी . भोसले सर यांचे तर खूप मोठे योगदान मला मिळाले. त्यांच्यामुळे मी स्टेज वर कस उभारून बोलायचं, समोरच्याला न दुखावता त्याच्या सर्व शंकाचे निरसन करायचे हे मी शिकलो. डी. बी. पाटील सर यांच्यामुळे विज्ञानाची भीती, तर दुधाणे मॅडम यांच्या गणित विषयाने मला माझ्या जीवनाचं गणित कळालं.

पाटील सरांच्या भूगोल विषयाने संपूर्ण जगाची माहीती मिळाली, चौगुले मॅडम यांच्या मराठी विषयाने मातृभूमीचा अर्थ कळाला. पवार सर, कांबळे सर, ए. एल. भोसले सर यांनी माझे हस्ताक्षर सुधारण्यासाठी खुप प्रयत्न केले. आर. बी.  पाटील सर यांच्यामुळे खेळाची वृत्ती जोपासली गेली. महेश सर, मोहन पाटील सर, शिवाजी सर यांच्यामुळे कधी एकटेपणाची जाणीव झाली नाही. या सर्वांचा मी खूप खूप ऋणी आहे. मला या सर्वांची खूप आठवण येते. मी आज जे काही आहे ते सर्व या शिक्षकांमुळे आणि या शाळेमुळे. मी या सर्वांना असेच कायम गुरू म्हणून माझ्या पाठीशी उभे राहून मला प्रोत्साहन द्यावे. 
पुढारी ऑनलाईनने मला माझ्या शिक्षकांविषयी मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुढारीचा आभारी आहे.

प्रथमेश मनोहर दिंडे, रा. कुशिरे.