Mon, May 20, 2019 09:06होमपेज › Kolhapur › देसाई सरांच्या सवयी आत्मसात केल्या : संजय पांडूरंग भोसले

देसाई सरांच्या सवयी आत्मसात केल्या : संजय पांडूरंग भोसले

Published On: Sep 05 2018 10:08AM | Last Updated: Sep 05 2018 10:08AMदेसाई सरांच्या सवयी आत्मसात केल्या : संजय पांडूरंग भोसले

मी संजय पांडुरंग भोसले रा. कोडोली  ता.पन्हाळा जि. कोल्हापुर. सन 1991-92 ची गोष्ट आहे. मी तेव्हा दहावीला होतो.माझी शाळा रयत शिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल, गार्डी घानवड ता. खानापूर जि. सांगली येथे होती. मला मराठी विषय शिकवण्यासाठी श्री. देसाई सर होते. खूप छान मराठी विषय ते शिकवीत असत. त्यांनी शिकवलेल्या कविता आजही मला तोंडपाठ आहेत. सरांची एक सवय होती . दररोज संध्याकाळी ते शाळेच्या मैदानावर धावण्यासाठी येत असत. आम्ही दहावीचे विद्यार्थी असल्यामुळे नाइट स्टडीसाठी शाळेत थांबत असू . सर त्यांचा व्यायाम झाल्यानंतर आम्हाला भविष्याबद्दल छानछान गोष्टी सांगत असत. त्यांच्या या दोन्ही सवयी  आज मी अंगिकृत केल्या आहेत. सर मी तुम्हाला खूप मिस करत आहे.