Sat, Mar 23, 2019 02:04होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात ४०० बकरी, २५००कोंबड्या फस्त

कोल्हापुरात ४०० बकरी, २५००कोंबड्या फस्त

Published On: Aug 11 2018 1:20AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

त्र्यंबोली यात्रा साजरी करत कोल्हापूरसह जिल्ह्यात शुक्रवारी गटारी अमावस्या साजरी करण्यात आली. मटण नेण्यासाठी सकाळपासूनच मटणाच्या दुकानावर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे दिसत होते. त्यातच गुरुवारचा बंद, यामुळे बकर्‍यांचा माल येऊ शकला नाही. त्यामुळे शुक्रवारी दुपारीनंतर शहरातील अनेक भागातील दुकानदारांना मटणाची दुकाने बंद ठेवावी लागली. दुपारी चारनंतर माडग्याळ (जि. सांगली) हून आठ ते दहा गाड्यातून बकरी आणली. त्यानंतर दुकाने सुरू झाली. दिवसभरात 400 बकरी, 2500 कोंबड्या, 4 टन मासे विक्री झाली. 

रविवारपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार करण्याचे टाळतात. त्यासाठी अमावस्या ही शेवटची डेटलाईन मानून अनेकांनी शुक्रवारी मांसाहारी जेवणाचा बेत ठरविला होता. त्यासाठी मटण, मासे, कोंबड्या खरेदी करण्यासाठी लक्ष्मीपुरीतील मुख्य मार्केटमध्ये मटण नेण्यासाठी सकाळपासून ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. गुरुवारी महाराष्ट्र बंद होता. त्यामुळे माल वाहतुकीसह सर्व वाहतूक बंद होती. यामुळे बकरी, कोंबड्या आणता आल्या नाहीत. मात्र, आखाडी असल्यामुळे विक्रेत्यांनी जेवढी बकरी शिल्लक होती, तेवढी घेऊन सकाळपासून मटणाची दुकाने सुरू ठेवली होती. सहकुटुंब जेवणाचे बेत आखल्यामुळे दोन ते पाच किलो त्यापेक्षाही जास्त मटण खरेदी करणारे जास्त होते. त्यामुळे विक्रेत्यांना मटण तोडून घाम फुटल्याशिवाय राहिले नाही. 
दुपारी मालाची टंचाई
गुरुवारी महाराष्ट्र बंद होता. त्यामुळे लोणंद, कराड, साईखेडा, जत येथील बकर्‍यांचा बाजार भरू शकला नाही. त्यामुळे माल मिळाला नाही. त्यामुळे मटण विक्रेत्यांकडे जेवढा माल शिल्लक होता, तेवढावर दुकाने सुरू होती. हा माल दुपारपर्यंत पुरला, दुपारी अडीच नंतर मटण विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवावी लागली. सायंकाळी साडेचारच्या दरम्यान माडग्याळहून सात ते आठ ट्रकमधून बराचा माल कोल्हापुरात आला. त्यानंतर मटण विक्रेत्यांनी पुन्हा दुकाने सुरू करण्यात आली, रात्री आठ वाजेपर्यंत मटणाची दुकाने सुरू होती, असे खाटिक समाज या संस्थेचे अध्यक्ष जयदीप घोटणे यांनी सांगितले. बकर्‍यांची कमतरता असताना विक्रेत्यांनी मटणाचा दर वाढवला नाही, असेही घोटणे यांनी सांगितले.