Sun, May 26, 2019 19:51होमपेज › Kolhapur › निखिल गायकवाड खून; त्याच्याच दोन मित्रांना अटक

निखिल गायकवाड खून; त्याच्याच दोन मित्रांना अटक

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 13 2018 12:28AM

बुकमार्क करा
पेठवडगाव : वार्ताहर 

कोल्हापूर येथील निखिल दिनकरराव गायकवाड या युवकाचा घातपात त्याच्याच जीवलग मित्र रोहित राजेंद्र कोळी(वय 29, रा. मंगळवार पेठ) व सुमित राजेंद्र सावंत (वय 28, रा. भगतसिंह चौक) या दोन जीवलग मित्रांनीच केला असल्याचा आरोप मयत निखिलचे वडील दिनकरराव गायकवाड यांनी केला आहे. यानुसार या दोघांवर  खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अटक करण्यात आली आहे.
मयत निखिल हा कोल्हापूर येथील उमदा उधोजक होता. निखिल, रोहित व सुमित  हे जीवलग मित्र होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी वाठार हद्दीतील एका जलसा केंद्रावर संगीत बारीसाठी हे तिघे मोटारसायकलवरून आले होते. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत ते मध्यरात्री घराकडे जाण्यास निघाले. दरम्यान, ते कोल्हापूरच्या दिशेने न जाता ते पुण्याच्या दिशेने गेले. दरम्यान, मध्ये किणी टोल नाका लागल्याने पुन्हा ते मागे वळून कोल्हापूरच्या दिशेने निघाले. दरम्यान, वाठार पुलावर सकाळी हायवे सफाई कर्मचारी यांना निखिल बेशुद्ध अवस्थेत दुभाजकमध्ये आढळून आला. कोल्हापूर येथे उपचार घेत असताना निखिलचा मृत्यू झाला.

निखिलच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी दोघांवर यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. मात्र, दोन महिने उलटल्यावर पुन्हा निखिल मूत्यूप्रकरणी रोहित कोळी व सुमित सावंत या दोघांवर गुन्हा आज दाखल झाला आहे. दोघांना अटक केली आहे. अधिक तपास पो. नि. यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नी.  गजानन देशमुख करीत आहेत.