Wed, Jul 24, 2019 12:31होमपेज › Kolhapur › निखिल गायकवाड खूनप्रकरणी दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

निखिल गायकवाड खूनप्रकरणी दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 1:22AM

बुकमार्क करा
पेठवडगाव : वार्ताहर

कोल्हापूर येथील निखिल दिनकरराव गायकवाड या युवकाच्या घातपातीच्या आरोपातून अटक केलेल्या रोहित राजेंद्र कोळी (वय 29, मंगळवार पेठ), सुमित राजेंद्र सावंत (28, भगतसिंग चौक, कोल्हापूर) या संशयितांना शनिवारी वडगाव न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाकारी एस. एम. जाधव यांच्यासमोर उभे केले असता त्यांनी 5 दिवसांची  पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

मृत निखिल गायकवाड यांच्या मृत्यूस त्यांचे जिवलग मित्र रोहित व सुमित जबाबदार असल्याची फिर्याद निखिलचे वडील दिनकरराव गायकवाड यांनी वडगाव पोलिस ठाण्यात दिल्याने खळबळ माजली. पो. नि. यशवंत गवारी यांनी तत्काळ या दोघांना अटक केली. या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.आज वडगाव न्यायालयात संशयित आरोपी रोहित व सुमित यांना उभे केले. दरम्यान पो.नि. यशवंत गवारी यांनी आरोपींना जास्तीत जास्त दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

आरोपी यांनी कोल्हापूर जाण्या ऐवजी पुण्याच्या दिशेने जाण्याचा मार्ग का स्वीकारला, गुन्ह्यातील वाहन, आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती केली. या मागणीनुसार न्यायमूर्ती जाधव यांनी आरोपींना 5 दिवसांची पोलिस  कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.