Mon, Jun 24, 2019 20:57होमपेज › Kolhapur › निसर्गानेही दिली साथ दूध आंदोलनाला

निसर्गानेही दिली साथ दूध आंदोलनाला

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 1:50AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

जिल्ह्यात जवळपास 50 गावांचा थेट संपर्क तुटल्याने दूध दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला निसर्गाचीही साथ मिळाल्याचे मानले जात आहे. जोरदार पावसामुळे रस्ते, बंधारे आणि पुलावर पाणी आल्याने जिल्ह्यात ही स्थिती उद्भवली आहे.

चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा आणि शाहूवाडी या तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे या सर्व तालुक्यातील नद्यांना पूर आले आहेत. परिणामी अनेक गावचे रस्ते तसेच ओढे आणि नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे 50 हून अधिक गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. चालणेही कठीण झाल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे दूध संकलन आणि वाहतुकीतही अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे गोकुळसह वारणा व इतर संघांचे दूध संकलन आणि वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.