Mon, Jun 24, 2019 17:47होमपेज › Kolhapur › राष्ट्रीय नेमबाजीत विराज रोकडे याला दोन रौप्य, दोन कांस्यपदके

राष्ट्रीय नेमबाजीत विराज रोकडे याला दोन रौप्य, दोन कांस्यपदके

Published On: Jan 05 2018 1:13AM | Last Updated: Jan 05 2018 12:09AM

बुकमार्क करा
कंदलगाव : प्रतिनिधी

त्रिवेंद्रम (केरळ) येथे झालेल्या 61 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत विराज विजय रोकडे याने दोन रौप्य, दोन कांस्यपदके मिळविली. तसेच 25 मीटर रॅपिड पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना संभाजी पाटील, हर्षवर्धन यादव यांच्या साथीने 1601 गुण मिळवत कांस्यपदक मिळविले.

आयएसएसएफ सिव्हेलियन चॅम्पियनशिप या प्रकारात रौप्यपदक मिळविले. विराज क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू आहे. त्याला प्राचार्य माणिक वाघमारे, प्रशिक्षक अजित पाटील, युवराज साळोखे, तौसिफ सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. तो राधाबाई शिंदे इंग्लिश मीडीयम स्कूलचा विद्यार्थी आहे.