Fri, Jan 18, 2019 08:55होमपेज › Kolhapur › मराठा समाज जागेप्रश्‍नी नृसिंहवाडीत बंद

मराठा समाज जागेप्रश्‍नी नृसिंहवाडीत बंद

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 20 2018 11:37PMनृसिंहवाडी : प्रतिनिधी

संभाजीनगर येथील नृसिंहवाडीनजीकची सि.स.नं.66 ची जागा राज्य शासनाच्या अधिकारात आहे. या जागेची मागणी ग्रामपंचायत शासनाकडे करेल व त्यातील काही भाग मराठा भवनाला देण्यासाठी निश्‍चित प्रयत्न करू, असे आश्‍वासन सत्तारूढ आघाडीचे नेते धनाजीराव जगदाळे, सरपंच ललिता बरगाले, उपसरपंच अशोक पुजारी यांनी दिले. त्यानंतर दुपारी एक वाजता पुकारलेला नृसिंहवाडी बंद मागे घेण्यात आला. बंद शांततेत पार पडला.

मराठा समाजाचे अध्यक्ष मोहन माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, पंचायतीने मासिक सभेत ठराव करून ना हरकत दाखला द्यावा याबाबतचा ठराव ग्रामसभेत झाला आहे, असे नमूद करण्यात आले आहे. सत्तारूढ आघाडी प्रमुख जगदाळे म्हणाले, सि.स.नं.66 ची जागा शासनाची आहे. त्यामुळे ही जागा ताब्यात मिळविण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरपंच बरगाले व उपसरपंच पुजारी यांनी मराठा भवनाचा प्रश्‍न  मार्गी लावण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करू, असे आश्‍वासन यावेळी 
दिले.

माजी उपसरपंच अनंत धनवडे यांनी मराठा समाजावर आजपर्यंत अन्याय झाला आहे. तो दूर करावा, अशी मागणी केली. यावेळी शिवाजी भोसले, रमेश मोरे, दिगंबर शैलार, युवा नेते सुनील धनवडे आदी उपस्थित होते.

मराठा भवनाला कोणाचाही विरोध नाही

संभाजीनगर येथे मराठा भवन होण्यास कोणाचा विरोध नाही. असे असताना बंद कशाकरिता केला जात आहे, असे मत विरोधी दत्तराज आघाडीच्या काही नेत्यांनी व्यक्‍त केले. देवस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी यांनी बंदबाबत यापुढे ग्रामस्थांना विश्‍वासात घ्यावे, असे सांगितले. यापुढे तीन तास बंद पाळावाबंदमुळे यात्रेकरू ग्रामस्थांची गैरसोय होते. यापुढे कोणतेही कारण असो बंद तीन तासच पाळला जावा, असे उपसरपंच अशोक पुजारी म्हणाले.