Tue, Jul 23, 2019 01:55होमपेज › Kolhapur › Live : शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी : राणे

Live : शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी : राणे

Published On: Dec 08 2017 7:00PM | Last Updated: Dec 08 2017 9:32PM

बुकमार्क करा


कोल्हापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आज, कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे.  सभेच्या ठिकाणी व्यासपीठावर राणे समर्थक नेत्यांची मांदियाळी असून, नारायण राणे आणि  माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले आहे. भाषणात नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापुरात सहा आमदार असूनही कोल्हापूरला मंत्रिपद का नाही?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

सामान्यांना न्याय द्यायचा असेल, तर आपला स्वतःचा पक्ष असला पाहिजे, अशा भावनेने पक्षाची स्थापना केली आहे. आता दिल्लीहून फोन येणार नाही, तर मुंबईहून फोन येणार नाही. हा फोन फक्त तुमचा आणि आमचा असणार आहे, असे राणे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये तीन वेळा घोर अपमान झाल्यानंतर माझ्यासारखा स्वाभिमानी माणूस कसा पक्षात थांबेल, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.

 

नारायण राणे म्हणतात

- अशोक चव्हाण तुमच्या सारखा सज्जन माणूस काँग्रेसची विचारसरणी विसरून कसा शकतो

- राणे उभे राहणार म्हणून तुम्ही शिवसेनेशी हातमिळवणीची तयारी दाखवलीत 

- कोल्हापूरने मला प्रेरणा दिली, हे प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात जाईन आणि वंचितांना न्याय देईन 

- माझा पक्ष माझा किंवा नितेश, निलेशचा नाही, हा तुमचा आमचा पक्ष आहे.

- माझ्यावर विश्वास ठेवा, हा स्वाभिमानी पक्ष राणे कुटुंबाचा नाही

- राज्यात जेवढा विजय मिळवेल तेवढा आपण जनतेला न्याय मिळवून दिला 

- कल्याणकारी राज्य स्थापन करायचं आहे, तुमची साथ तुमचा आशीर्वाद हवा आहे

- माझे प्रशासन तुम्ही पाहिले आहे, जनतेची कामे प्रशासनाकडून करून घेण्याची धमक आहे 

- बांद्रा निवडणूक सोनिया गांधींच्या आग्रहामुळे लढलो 

- काँग्रेसमधील नेत्यांनीच तेथे माझ्या पराभवासाठी प्रयत्न केला होता; हे राजकारण मी जवळून पाहिले 

- काँग्रेसमध्ये जेवढे नेते तेवढे गट आहेत. 

- विलासराव देशमुखांच्या जागी मुख्यमंत्रीपदी माझी वर्णी लागणार होती

- ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी विमानात मला शब्द दिला होता.

- दुसऱ्या दिवशी आमदार तुमच्यावर नाराज आहेत, असे सांगून सोनिया गांधींनी अशोक चव्हाण यांचे नाव जाहीर केले 

- शिवसेनेचा जन्म झाले तेव्हा सोळा वर्षांचा होतो 

- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रेम दिले, विश्वास दिला 

- शिवसेनेत मंत्रिपदे अशीच मिळाली का? माझे कर्तृत्व काहीच नव्हते का?

- कोल्हापुरात सहा आमदार असूनही मंत्रिपद का नाही?

- उद्धव ठाकरे म्हणतात, १०० टक्के निकाल द्या, १० पैकी सहा आमदार कमी आहेत का?

- उद्धव ठाकरे काही दिवसांत अमेरिकेच्या अध्यक्षांवरही टीका करतील

- शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी त्यांना काही देणे घेणे नाही 

- कोल्हापूरच्या प्रश्नांबाबत त्यांनी दौऱ्यात का विचार नाही केला?

- मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका कशी करू शकतात? 

- कर्जमाफीसाठी सत्तेवर लाथ मारेन, हा इशारा कितीवेळा दिला?

- उद्धव ठाकरे वक्तृत्व तुमच्या रक्तात आहे, पण ते असचं येत नाही 

- कोणालाही घाबरण्याचा माझा पिंड नाही, मला ते जमतच नाही 

- केवळ टीका करायची, वेठीला धरायचं, हे बरोबर नाही 

- सत्तेत आल्यानंतर यांनी जनतेला न्याय द्यायला हवा होता

- ठाकरेंचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे 

- कोल्हापुरात म्हणाले, वाघांचे दर्शन झाले, असे उद्धव ठाकरे म्हणाले

- शिवसेना पूर्वीसारखी राहिली नाही, मराठी माणसासाठीची ही शिवसेना नाही.

- शिवसेनेने बेकारीचा प्रश्न सोडविला का?

- कोल्हापुरातील एमआयडीसीचे प्रश्न सोडविले काय?

- मुंबई, ना सिंगापूर झाली ना शांघाय झाली, 

- पैसे घेतल्याशिवाय टेंडर नाही, अशी मुंबईत परिस्थिती आहे 

- मुंबईतील मराठी माणूस कधीच मुंबईतून हद्दपार झाला

- शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे 

- नारायण राणे आमदार होऊ नये, मंत्री होऊ नये म्हणून किती पक्ष एकत्र आले

- शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हे पक्ष एकत्र येत नाही, राणेंना रोखण्यासाठी मात्र येतात, हाच माझा विजय 

- विकासाच्या प्रश्नावर चर्चा न करता, राणेंच्या मागे कशाला धावता, एखादा सिनेमा तरी काढा माझ्यावर

- १९९९ मध्ये सत्ता उद्धव ठाकरे यांच्यामुळे गेली 

- बाळासाहेबांच्या पत्रकार परिषदेत मला आणि गोपिनाथ मुंडे यांना बसण्यास खुर्चाही दिल्या नाहीत. 

- अशा १९ घटना मी बाळासाहेब ठाकरे यांना लिहून दिल्या होत्या, तुमचा मुलगा असा वागतो. 

- साहेबांचे माझे संभाषण कधीच सांगितले नाही, बाळासाहेब ठाकरेंसाठी काहीही करण्याची तयारी होती 

 

संबंधित बातमी वाचा : उद्धव ठाकरेंना नाक राहिलेले नाही : राणे