Thu, Mar 21, 2019 11:08होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना संपवणार; राणेंचा इशारा

उद्धव ठाकरेंना नाक राहिलेले नाही : राणे

Published On: Dec 08 2017 6:27PM | Last Updated: Dec 08 2017 6:27PM

बुकमार्क करा

 

कोल्हापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आहेत. पुढील निवडणुकीत ते झिरो करायचे आहेत. पण, या आमदारांना पराभूत करायचे नाही तर, त्यांना दुसरीकडून निवडून आणायचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून सत्तेत राहण्यासाठी उध्दव ठाकरे यांचे नाक घासून घासून आता राहिलेले नाही. त्यांना राजकारणही कळत नसल्याची टिका माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. उद्धव ठाकरे यांना राजकारण कळत नाही. 'ए माझ्या वाघांनो', असा जंगलात गेल्या सारखा शब्दप्रयोग ते करतात. हल्ली त्यांनी अमेरिकेचे  अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करणे तेवढे बाकी राहिले आहे, अशा शब्दांत राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 

माजी मुख्यमंत्री राणे म्हणाले, 'माझ्या पक्षाची सुरवात कोल्हापूरातून होत आहे. कोल्हापूरासह राज्यात सर्वच पक्षांतून आमच्या पक्षात लोक प्रवेशासाठी इच्छूक आहेत. माझ्या विधानपरिषदेच्या उमेदवारीपूर्वी कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने जाहीर बैठका घेऊन मला विरोध केला. मी उमेदवार असतो तर कॉग्रेस, राष्ट्रवादीची मते मोठ्या प्रमाणात फुटली असती तर शिवसेनेचीही किमान पंचवीस मते मी घेतली असती.' 

गुजरात निवडणुक प्रचारात राहूल गांधींच्या सभेला प्रचंड गर्दी होत आहे. ते तरुण व डायनॅमिक नेते असल्याने आता तुम्ही कॉग्रेसमध्ये नसल्याचे वाईट वाटत नाही का? या प्रश्‍नावर राणे म्हणाले, 'डायनॅमिक शब्दाचा अर्थ डिक्शनरीत पहावा लागेल. ते या शब्दांत बसतता का पाहीन. गांधी यांच्या लोकप्रियतेत भर पडते असे म्हणा, पण गुजरातच्या निवडणूक निकाल काय लागेल यावर त्यांचे नेतृत्व दिसून येईल. एकदा सोडले तर सोडले मी सोनिया गांधी राहूल गांधी या नेत्यांबाबत बोलणार नाही पण, काँग्रेसविरोधात बोलणार. मी यापूर्वी कधी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही बोललो नाही.  


संबंधित बातमी वाचा : Live : शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी : राणे