Thu, Apr 25, 2019 18:01होमपेज › Kolhapur › मुरगूड फुटबॉल स्पर्धेत सानिका स्पोर्टस्ला अजिंक्यपद 

मुरगूड फुटबॉल स्पर्धेत सानिका स्पोर्टस्ला अजिंक्यपद 

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 05 2018 11:57PMमुदाळतिट्टा : प्रतिनिधी


स्व. विक्रमसिंहराजे घाटगे फौंडेशन, सप्ततारा तरुण मंडळ व सानिका स्पोर्ट्स मुरगूड यांच्या संयुक्त विद्यमाने राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य फुटबॉल स्पर्धेत मुरगूडच्याच सानिका स्पोर्टस्ने संघर्ष गडहिंग्लजचा 2:0 गोलने पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला. कडवी झुंज देणारा संघर्ष गडहिंग्लजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

सानिका स्पोर्टस व संघर्ष गडहिंग्लज संघाबरोबरच्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये 19 व्या मिनिटाला सानिकाच्या किरण कावणेकर याने गोल केला. दुसर्‍या हाफमध्ये सानिकाच्या किरण कावणेकर याने मारलेला जोरदार फटका संघर्षचा गोलकिपर तोहसीन भोजगर याने झेप घेत अडवला. शेवटची पाच मिनीटे शिल्लक असताना पुन्हा एकदा सानिकाच्या किरण कावणेकर याने संघर्षच्या गोलकिपरला चकवित दुसरा गोल करीत 2:0 गोलने संघर्षला नमवित स्पर्धेतील अजिंक्यपद पटकावले.

तिसरा क्रमांक गडहिंग्लजच्या नवज्योतने तर चौथा क्रमांक सिध्द फायटर्स मुरगूडने पटकावला. स्पर्धतील उत्कृष्ट खेळाडू : किरण कावणेकर (सानिका), बेस्ट स्ट्राईकर : समीर  साईनवार (सानिका), बेस्ट डिफेंडर : सौरब हारूगले (सिद्ध फायटर्स), मिड फिल्डर : इम्रान मानधर (सानिका) यांना पारितोषिक देण्यात आली आहेत.

स्पर्धेचे बक्षीस वितरण पुणे म्हाडाचे अध्यक्ष, शाहु साखरचे अध्यक्ष समरजितसिंहराजे घाटगे यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी समरजितसिंह घाटगे यांचे भाषण झाले. अमर चौगले यांची भारतीय जनता पार्टीच्या कागल तालुका उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष सुनिलराज सुर्यवंशी, दत्तामामा खराडे, उदयबाबा घोरपडे, रामचंद्र खराडे, शाहूचे संचालक मारुती निगवे, कागलचे नगरसेवक विशाल पाटील, राजाभाऊ माळी, अविनाश पाटील, संजय चौगले, किरण मुळीक, माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडीस, दगडू शेणवी, प्रदीप पाटील, प्रताप पाटील, वसंतराव पाटील, जयवंत नरके, एन. के. पाटील, प्रवीण चौगले, रार्बट फर्नाडीस, विलास गुरव, राहूल खराडे, सचिन गुरव, अनिल अर्जुने, संतोष गुजर, सुनील कांबळे, सुरज एकल, जयवंत पाटील,अविनाश डोंगरे, राजू फर्नांडीस, प्रकाश वंडकर, राजू खंडागळे, संजय कांबळे, संदिप वरपे आदी उपस्थीत होते. सामन्यासाठी पंच म्हणून निपाणी फुटबॉल अ‍ॅकॅडमीचे जॉन मडाले,ओंकार वडगावे, शिवकांत खानापूरे यांनी काम पाहिले.
स्वागत व प्रास्ताविक सुशांत मांगोरे यांनी केले. तर आभार अनिल अर्जूने यांनी मानले.