Sat, Sep 22, 2018 03:15होमपेज › Kolhapur › खून झालेली व्यक्‍ती तामगावची

खून झालेली व्यक्‍ती तामगावची

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

तामगाव (ता. करवीर) येथील  खुनाचे गूढ उकलण्यात करवीर पोलिसांना यश आले आहे. खुनानंतर मृतदेह सिमेंटच्या पोलला बांधून खाणीत फेकून देण्यात आलेली व्यक्‍ती तामगाव परिसरातील असल्याचे सोमवारी निष्पन्‍न झाले आहे. कपडे,  ताईत व अन्य वस्तू ओळखल्यानंतर मृताच्या पत्नीने पोलिस ठाण्यात हंबरडा फोडला. आर्थिक वाद अथवा अन्य कारणातून ‘सुपारी’बाज टोळीकडून कृत्य झाले असावे, असा पोलिस अधिकार्‍यांचा संशय आहे. दि. 3 ते 5 नोव्हेंबर 2017 काळात संबंधिताची ‘गेम’ झाली असावी, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

‘डीएनए’ चाचणी अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच मृताचे नाव जाहीर करण्यात येईल, असेही वरिष्ठ पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. संशयित मारेकर्‍याच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके विविध भागाकडे रवाना करण्यात आली आहेत. खून झालेल्या व्यक्‍तीचा लेथमशिन उद्योग होता. तो नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला; पण सुगावा लागला नाही. दि. 6 नोव्हेंबर 2017 मध्ये गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात पत्नीने घटनेची नोंद केली..मोरेवाडी येथील अमानुष घटनेचाही लवकरच पर्दाफाश शक्य आहे, असे करवीर पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, murdered, Tamgao


  •