होमपेज › Kolhapur › ‘संजय मंडलिक यांना खासदार करण्यासाठी देवाने शक्ती द्यावी’

‘यापुढे मंडलिकांच्या शिकवणीतून जिल्ह्याचे राजकारण’

Published On: Dec 18 2017 2:10AM | Last Updated: Dec 18 2017 11:16AM

बुकमार्क करा

मुरगूड : प्रतिनिधी

प्रा. संजय मंडलिकांनी खासदार व्हावं ही दिवंगत लोकनेते  सदाशिवराव मंडलिक यांची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हनुमंताने शक्ती द्यावी. त्यासाठी सर्वच जीवाचे रान करतील, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी मुरगूड येथे नगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. आ. मुश्रीफ म्हणाले, सदाशिवराव  मंडलिकांमुळे मुरगूडला वेगळी परंपरा आहे. ही खंडित झालेली परंपरा सुरू राहण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कागल शहराच्या विकासासाठी भरपूर निधी आणला. आता यापुढे मुरगूडच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन.     

आ. सतेज पाटील म्हणाले, मंडलिक यांनी दिलेल्या शिकवणीतून यापुढे जिल्ह्याचे राजकारण चालेल. हा जिल्हा आपल्याला स्वच्छ करायचा आहे. त्याची सुरुवात ‘गोकुळ’पासून सुरू केल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. प्रा. संजय मंडलिक म्हणाले, सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्यातून मुरगूडचा विकास निश्‍चित होणार आहे. शहराचे अनेक प्रश्‍न मार्गी लावू. पाण्याचा प्रश्‍न सोडवू. जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे. आपण यापुढे विकासाच्या मुद्द्यावर हातात हात घालून काम करूया. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे व वीरेंद्र मंडलिक ,युवराज पाटील भैय्या माने आदी उपस्थित होते.स्वागत उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले यांनी केले. नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी प्रास्ताविक केले.