Tue, Mar 26, 2019 21:52होमपेज › Kolhapur › महापालिका शाळांच्या भिंती होणार बोलक्या

महापालिका शाळांच्या भिंती होणार बोलक्या

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 28 2018 11:56PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील भिंती बोलकल्या चित्राद्वारे रंगविण्यात येणार आहेत. त्याबरोबरच महापालिकेच्या 59 शाळांत मिशन शक्ती कायदा जागरुकता मोहिमही राबविला जाणार आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभेत गुरूवारी हे निर्णय घेण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती श्रीमती सुरेखा शहा होत्या. 

सावित्रीबाई फुले व पंचगंगा रुग्णालय येथे महिला प्रसुतीगृह बांधणे किंवा विस्तारीकरण करणे, विविध वैद्यकीय उपकरणे देणे, शाळेतील विद्यार्थींनीना मोफत सॅनीटरी नॅपकीन देणे, महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांच्या प्रभागातील शिक्षण समिती शाळांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी निधी देणे या सदस्य ठरावावर सभागृहात चर्चा होवून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले. 

यावेळी राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानचे व्यवस्थापक निवास कोळी यांनी कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत राबविण्यात येणार्‍या मोफत कोर्स व प्लॅस्टीक बंदीला पर्याय म्हणून कापडी पिशव्या तयार करण्याबाबत प्राथमिक माहिती आली. यावेळी उपसभापती छाया पोवार, अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, शमा मुल्ला, मेहजबीन सुभेदार, माधुरी लाड, ललिता बारामते, अर्चना पागर, उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी दिलीप पाटील, नगरसचिव दिवाकर कारंडे आदी उपस्थित होते.