Mon, Jun 24, 2019 20:59होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिर पुजारी विधेयक बारगळले

अंबाबाई मंदिर पुजारी विधेयक बारगळले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : चंद्रशेखर माताडे  

अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र कायदा करून पगारी पुजार्‍यांची नेमणूक करण्याची सुधारणा सुचविणारे विधेयक विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात येण्याची शक्यता धूसर बनली आहे. 
सिद्धिविनायक, शिर्डी व पंढरपूर मंदिरांच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरासाठी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीच्या बैठका झाल्या; पण कायद्याचा मसुदा अद्याप तयार झालेला नाही. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे कामकाज हे उपविधीनुसार चालते. देवस्थानला राजे व सरदार घराण्यांनी दिलेल्या जमिनी आहेत. मसुदा करताना क्लिष्टतेचा विचार केला जात आहे. घाईगडबडीने मसुदा तयार केला व कायद्याला आव्हान देण्यात आले, तर न्यायालयात उपस्थित होणार्‍या मुद्द्यांवर तो टिकला पाहिजे. मसुद्याची छाननी होऊन त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली की, मसुदा विधिमंडळात कायदा करण्यासाठी मांडला जाणार आहे. या नागपूर अधिवेशनात जी 13 विधेयके मांडण्यात येणार आहेत त्यांची सूची सरकारने जाहीर केली आहे. त्यामध्ये या विधेयकाचा समावेश करण्यात आलेला नाही.