Mon, Sep 16, 2019 18:25होमपेज › Kolhapur › आ. सतेज पाटील यांचे ‘गोकुळ’वर बिनबुडाचे आरोप

आ. सतेज पाटील यांचे ‘गोकुळ’वर बिनबुडाचे आरोप

Published On: Dec 07 2017 2:10AM | Last Updated: Dec 07 2017 2:05AM

बुकमार्क करा

मुदाळतिट्टा : प्रतिनिधी

विधानसभेच्या राजकारणाचे उट्टे काढण्यासाठी आणि येणार्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आ. सतेज पाटील ‘गोकुळ’वर बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांनी हे आरोप थांबवावेत. अन्यथा दूध उत्पादक तुम्हाला जशास तसे उत्तर देतील, असा इशारा देत कोल्हापूर येथे आयोजित निषेध मोर्चास कागल तालुक्यातून हजारो दूध उत्पादक उपस्थित राहणार असल्याचे गोकुळचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रणजितसिंह पाटील यांनी सांगितले.

सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघावर विविध मुद्द्यांवरून बेछूट आरोप केले आहेत. या सर्वांचा निषेध करण्यासाठी सत्ताधारी मंडळीकडून 7 डिसेंबरला कोल्हापूर येथे निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर कागल तालुक्यातील दूध उत्पादक सभासदांचा मेळावा बोरवडे दूध शीतकरण केंद्र येथे आयोजित केला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मेळाव्यास तालुका संघाचे संचालक नानासो पाटील, मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष अशोक खंडागळे, महादेव पेडणेकर, रघुनाथ बोंगार्डे, रघुनाथ कुंभार, दगडू शेणवी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक भैरवनाथ खांडेकर यांनी केले. आभार दत्तात्रय पाटील (बेलवळेकर) यांनी मानले.