Sun, Jul 21, 2019 05:33होमपेज › Kolhapur › अनुजा मोहिते, ऋतुजा जगदाळेला विजेतेपद

अनुजा मोहिते, ऋतुजा जगदाळेला विजेतेपद

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 1:46AMमुदाळतिट्टा : प्रतिनिधी 

जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र अमेच्युर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या मार्गदर्शनखाली कार्यरत असलेल्या   सिंधुदुर्ग जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशन बांदेगाव जि. देवगड आणि कोल्हापूर जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशन   व सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक अजिक्यपद  राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अक्रोबक्टिस जिम्नॅस्टिक्स प्रकारात मुंबई, सांगली संघांनी वर्चस्व राखले. मुंबई उपनगरच्या अनुजा मोहिते, ऋतुजा जगदाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शनिवारी दिवसभर झालेल्या 24 व्या अक्रोबक्टिस जिम्नॅस्टिक्समध्ये

गटनिहाय निकाल असा - महिला सिनिअर गट : अनुजा मोहिते, ऋतुजा जगदाळे प्रथम (मुंबई), ईसा मुल्ला, यशोदा इंगळे द्वितीय(सांगली),अजनी कलकुटकी, सानिका जगताप तृतीय (कोल्हापूर) पुरुष सिनिअर विभाग : कुणाल कोटकर, बाबासाहेब आयवाळे  अरविंद शिंदे  (मुंबई), अजिक्य पाटील, योगेश भेंडवडे, श्रीपा शिंगे, सूरज हुलवान, (सांगली, प्रतीक पाटील, सचिन प्रधान, रोहन गायकवाड , अमोल कांबळे (नांदेड). या स्पर्धेवेळी महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक असोसिएनचे अध्यक्ष  गौतम पाटील, प्रा.  बाळ देसाई, मनोज फराक्टे, बापूराव पाटील, सचिव सविता मराठे, पं. स. सदस्य संग्राम देसाई  आदी उपस्थित होते. दरम्यान, स्पर्धेचे उद्घाटन डी.वाय. पाटील गु्रपचे ऋतुराज संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बिद्रीचे संचालक अशोक कांबळे, महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष गौतम पाटील,  सचिव सौ. सविता मराठे, रणजितसिंह पाटील, उपाध्यक्ष  सदानंद पोसे, एन. एच. पाटील, क्रीडाशिक्षक टी. एम. रेडेकर, प्रा. सचिन पाटील आदी उपस्थित होते.