Sat, Jul 20, 2019 23:22होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : महाराष्ट्र बंदचे कुरुंदवाडमध्ये तीव्र पडसाद 

कोल्हापूर : महाराष्ट्र बंदचे कुरुंदवाडमध्ये तीव्र पडसाद 

Published On: Jul 24 2018 11:41AM | Last Updated: Jul 24 2018 11:41AMकुरुंदवाड : प्रतिनिधी 

कुरुंदवाड येथे  मराठा आरक्षण मागणीसाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करून शहरात जोरदार निदर्शनाला सुरवात करण्यात आली आहे.

शिवतीर्थ येथे रास्ता रोको करून मोर्चाने शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, भाजी मंडई, मच्छी मार्केट, एसटी बस डेपोला भेट देऊन बंद ठेवण्याची आवाहन करण्यात आले. शिवतीर्थ ते नृसिंहवाडी तसेच शिवतीर्थ ते भाजीपाला मार्केटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.महाराणा प्रताप चौक पालिका चौक येथे टायरी पेटवून  रास्ता रोको करण्यात आले.

दरम्यान, एका आंदोलकाला पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यामुळे ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. सपोनि.कुमार कदम यांनी आंदोलकांना जाळपोळ, दगडफेक न करता सहनशीलतेच्या मार्गाने आंदोलन करा असे सांगत शांतता राखण्याचे आवाहन केले.  सध्या पालिका चौकामध्ये निषेध सभा सुरू आहे.