Mon, Nov 19, 2018 12:58होमपेज › Kolhapur › स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा आज गळफास मोर्चा

स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा आज गळफास मोर्चा

Published On: Feb 06 2018 8:02PM | Last Updated: Feb 06 2018 11:18PMकोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत बसविलेल्या डमी उमेदवार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, तसेच राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, राज्यसेवेच्या पदसंख्येत वाढ करावी, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीतर्फे आज (दि. 7) दुपारी 12.30 वाजता गळफास मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षेचे परीक्षार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

बिंदू चौक येथून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. विविध विभागांत रिक्‍त असलेली 1 लाख 70 हजार पदे त्वरित भरण्यात यावीत. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील चार लाख 20 हजार पदे रद्द न करता ती तातडीने भरावीत. प्राध्यापकांची 9 हजार व शिक्षकांची 23 हजार पदे भरण्यात यावीत. राज्यसेवेच्या प्रत्येक परीक्षेत प्रतीक्षा यादी लावण्यात यावी. स्पर्धा परीक्षेतील डमी प्रकारास आळा घालून त्याची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी. 

बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घ्यावी, आदी मागण्या या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात येणार आहेत. यानंतर कृती समितीतर्फे मोर्चाचे राज्यभरात आयोजन करण्यात येणार आहे.