Wed, Nov 14, 2018 19:34होमपेज › Kolhapur › दुध माफियांचा सरकारच्या पैशांवर दरोडा : शेट्टी

दुध माफियांचा सरकारच्या पैशांवर दरोडा : शेट्टी

Published On: Jul 16 2018 11:38AM | Last Updated: Jul 16 2018 11:39AMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

दूध माफियांनी सरकारच्या पैशांवर दरोडा टाकला आहे, असा आरोप स्वाभिमानी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ देण्याची मागणी करत 'स्वाभिमानी'ने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी दुध उत्पादनाबाबतचे  सरकारचे धोरण फसले आहे, असा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यासोबत आम्ही चर्चेस तयार आहोत. प्रतिलिटर पाच रुपये दूध दरवाढीची मागणी सरकारने विधीमंडळ अधिवेशनात मान्य केल्यास आम्ही आंदोलन मागे घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

सरकारच्या आडमुठे धोरणामुळे रस्त्यावर उतरावं लागले, असे त्यांनी नमूद केले आहे. दूध विकू नका, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. वारकरी, गरिबांमध्ये दुधाचं वाटप केले, असेही त्यांनी सांगितले.