कोल्हापूर : नवे ४ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह

Last Updated: Jun 07 2020 11:47AM
Responsive image


कोल्हापूर: पुढारी ऑनलाईन

जिल्ह्यात नवे चार कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले असुन एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ६६५ वर पोहचली आहे. तर जिल्ह्यात ४२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या, २३२ कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज (दि.७) प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नवे चार कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दोन रूग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. 

काल  (दि.६) जिल्ह्यात आणखी पाच जण कोरोनामुक्‍त झाले. तर दोन नवे बाधीत रूग्ण आढळले. आजरा तालुक्यात दोन नवे रुग्ण आढळून आले तर याच तालुक्यातील वडकशिवाले येथील ५२ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ८ वर, कोरोनामुक्‍त झालेल्यांची संख्या ४२४ वर तर कोरोनाबाधितांची संख्या ६६१ वर होती.