Tue, Jul 23, 2019 06:19होमपेज › Kolhapur › बी.टेक. पदवी प्रमाणपत्रांतील त्रुटींचा घोळ संपता संपेना

बी.टेक. पदवी प्रमाणपत्रांतील त्रुटींचा घोळ संपता संपेना

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 20 2018 11:46PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठाच्या बी. टेक. पदवीच्या अनेक प्रमाणपत्रांमध्ये नाव, पत्ता व अभ्यासक्रमांची नावे चुकीची पडल्याचे सोमवारी (काल) दीक्षान्त समारंभादिवशी दिसून आले. मंगळवारी दुसर्‍या दिवशीही प्रमाणपत्रांत त्रुटी असल्याच्या विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत. आज, मंगळवारी पंचवीसहून अधिक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्याचे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले. 

शिवाजी विद्यापीठात दीक्षान्त समारंभात पदवी प्रमाणपत्र वाटप करताना बी. टेक. पदवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांतील  नाव, पत्ता तसेच अभ्यासक्रमांच्या नावांत चूक असल्याचे दिसून  आले. यावेळी विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार करून नाराजी व्यक्‍त करण्यास सुरुवात केली. तीनशे पदवी प्रमाणपत्रांपैकी जवळपास निम्म्या प्रमाणपत्रांत त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्‍त केली. प्रमाणपत्रे तत्काळ बदलून दिली जातील, असे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. आज दुसर्‍या दिवशीही अनेक प्रमाणपत्रांत त्रुटी असल्याचे दिसून आले. जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र बदलून देण्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे. 

 

tags : kolhapur, kolhapur news, miss management,  shivaji university, b.tech degree certificate