होमपेज › Kolhapur › अल्पवयीन मुलीकडून मुलाचे लैंगिक शोषण

अल्पवयीन मुलीकडून मुलाचे लैंगिक शोषण

Published On: Feb 21 2018 2:06AM | Last Updated: Feb 21 2018 2:06AMकोल्हापूर : प्रतिनिधी

एका अल्पवयीन मुलीकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या मुलीने संबंधित मुलाच्या गुप्तांगावर चटके देण्यासारखा अमानुष प्रकार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

गेली सहा वर्षे हा प्रकार सुरू होता. संबंधित अल्पवयीन मुलगा हा निरीक्षण गृहात राहणारा आहे. याबाबतची फिर्याद निरीक्षणगृहाच्या अधीक्षक अश्‍विनी गुजर यांनी दिली आहे. त्यानुसार भादंवि कलम 326, 504 बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 7 सह 8, बाल न्याय अधिनियम कलम 75 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपी  मुलगी ही कोल्हापुरातील राहणारी असून, हा गुन्हा ताराबाई पार्क येथील एका अपार्टमेंटमध्ये घडला आहे. संबंधित अल्पवयीन मुलगा हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षण बालगृह, पाण्याचा खजिना, मंगळवार पेठ येथे राहत आहे. 

वाचा : इचलकरंजीत दिव्यांग मुलीवर बलात्कार

 

 पीडित मुलाचे आरोपी मुलीने 2012 ते 2018 या कालावधीत लैंगिक शोषणासह अनैसर्गिक कृत्य करण्यास त्या मुलाला भाग पाडले. या आरोपी मुलीने पीडित मुलाला जिन्यावरून ढकलले, तसेच भिंतीवर डोके आपटून हातावर चटके दिले व पीडित मुलास अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले. आरोपी मुलीने पीडित मुलावर शारीरिक व मानसिक अत्याचार केलेले असून त्याच्याकडून स्वच्छतेचे व घर आवरण्याचे काम करून घेतले आहे. आरोपी मुलीने पीडित मुलाला त्याच्या आईशीही भेटू दिले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलाला कोणत्याही शाळेत दाखल केले नव्हते, असे फिर्यादीत म्हटले आहे.

​​​​​​​वाचा : ज्यांच्यासाठी मंत्रीपद पणाला लावले तेच पक्षाच्या विरोधात : मुश्रीफ