Tue, Jun 25, 2019 15:09



होमपेज › Kolhapur › उठसूट आंदोलन, ही काय मोगलाई का? सदाभाऊंचा शेट्टींना टोला (video)

उठसूट आंदोलन, ही काय मोगलाई का? सदाभाऊंचा शेट्टींना टोला (video)

Published On: Jan 12 2019 6:49PM | Last Updated: Jan 13 2019 1:37AM




कोल्हापूर : प्रतिनिधी

सरकार साखर कारखानदारांना मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी साखर कारखानदारी समोरील अडचणीबाबत केंद्र सरकारला अहवाल पाठवला आहे. त्यामुळे लवकरात लवकर साखर कारखान्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. पण उठसूट आंदोलन करतो, सरकारी कार्यालयावर दगड मारतो, ही काय मोगलाई लागून गेली आहे काय, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता लगावला आहे.

काही साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना पहिला हप्‍ता देण्याचे सुरु केले आहे. त्यामुळे आता एफआरपीचा प्रश्‍न संपत आहे. तरीही एफआरपीच्या प्रश्‍नावरुन राजकीय पोळी भाजण्याचे काम कारखानदार करत आहेत, अशी टिका मंत्री खोत यांनी केली. 

कृषी विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कला क्रिडा महोत्सवाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी मंत्री खोत कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.