Sat, Jul 20, 2019 23:21होमपेज › Kolhapur › जयसिंगपूर येथे गोकुळच्या दुधाचा टँकर पेटवला

जयसिंगपूर येथे गोकुळच्या दुधाचा टँकर पेटवला

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 1:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यात दूध दर आंदोलन मंगळवारी तीव्र झाले. रात्री अकराच्या दरम्यान जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात गोकुळ दूध संघाचा टँकर आंदोलकांनी पेटवला. तसेच जयसिंगपूर जनतारा हायस्कूलजवळ 20 कॅन दूध रस्त्यावर ओतण्यात आले. या आंदोलनाची गंभीर दखल पोलिस प्रशासनाने उदगाव येथे राज्य राखींव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

गोकुळ संघाचा टँकर दूध घेऊन निघाला होता. ही माहिती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजली. हा टँकर जयसिंगपूर रेल्वे स्थानक परिसरात आला होता. कार्यकर्त्यांनी या टँकरवर दगडफेक करून नासधूस केली. त्यानंतर हा टँकर पेटवून देण्यात आला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जयसिंगपूर आणि जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने उदगाव नाक्यावर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.