Sat, Jul 20, 2019 13:02होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : दुग्धाभिषेकाने दूध बंद आंदोलनाला सुरुवात 

कोल्‍हापूर : दुग्धाभिषेकाने दूध बंद आंदोलनाला सुरुवात 

Published On: Jul 16 2018 9:42AM | Last Updated: Jul 16 2018 9:42AMकुरुंदवाड: प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकर्‍यांच्या दुधाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व ग्रामदैवत मारूती मंदिरातील मूर्तीला बारा वाजून एक मिनिटाने दुग्धाभिषेक घालून दूध बंद आंदोलनाला सुरुवात केली. 
    
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा. यासाठी शेतकऱ्यांबरोबरच विविध संस्थांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून दूध संकलन बंद करावे असे आव्हानही केले आहे.

दरम्यान रात्री बारा वाजून एक मिनिटाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय गुरव, अॅड. जयकुमार पोमाजे, बंडू उमडाळे, योगेश जिवाजे या प्रमुख कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला व ग्रामदैवत मारुतीरायाला ही दुधाचा अभिषेक घालून दूध बंद आंदोलनाला सुरुवात केली. 

दरम्यान आज दिवसभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गायीचे दूध संकलन करून ते दूध वारकरी व विद्यार्थ्यांना वाटप करणार असल्याचे अॅड. जयकुमार पोमाजे यांनी सांगितले. यावेळी शिवाजी रोडे, मोनाप्पा चौगुले, आदिनाथ भबिरे, बब्बर पाटील, पापा पाटील, प्रशांत भबिरे, जिन्नापा भबिरे, गौतम पाटील, शांतीनाथ, जयंत चौगुलेसह आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.