होमपेज › Kolhapur › वजनकाट्यावर दूध मोजल्याने वर्षाला 64 कोटींचा फटका

वजनकाट्यावर दूध मोजल्याने वर्षाला 64 कोटींचा फटका

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दूध मापण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याबाबत कायद्यात कोणताही नाही. तरीही दूध संस्थामधून अशा वजनकाट्यांचा वापर केला जातो. या वजनकाट्यामध्ये 100 मिलीपेक्षा कमी दूध मोजले जात जाते. त्यामुळे शंभर मिलीपेक्षा कमी असलेल्या दुधातून उत्पादकांची वर्षाला 63 कोटी 87 लाख 50 हजार रुपयांचा फटका बसत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी पत्रकातून केला आहे.

दूध हे मापाने घ्यावयाचे असा कायदा आहे. दूध हे द्रव्य पदार्थ असल्याने त्याचे मोजमाप इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर होऊच शकत नाही, असे म्हणणे वैधमापनशास्त्र विभागाचे  आहे. याला दूध संस्था आणि कर्मचार्‍यांनी विरोध केला आहे. शासनाच्या दूध महापूर योजनासह अन्य योजनांमुळे दुधाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. उत्पादन वाढल्याने मापाने दूध घेणे शक्य नाही. तसे केल्यास त्याचा फटका, उत्पादक, संस्था आणि संघांना बसणार आहे. त्यामुळे दूध संस्थांनी मापाने दूध घेण्यास विरोध दर्शवला आहे. 

पण 100 मिलीच्या आतील दुधाचे मोजमाप होत नसल्याचे सत्य अनेक संस्थांमध्ये उघड झाल्याने यातील आर्थिक गैरव्यवहार बाहेर येत आहे. जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख दूध उत्पादक आहेत. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांवर दूध वजन करून घेतल्याने दोन्ही वेळचे 100 मिली दुधाचे मोजमाप होत नाही. 100 मिलीच्या दुधाची किंमत 5 रुपये धरल्यास दिवसाला जिल्ह्यातील 
साडेतीन लाख उत्पादकांचे  17 लाख 50 हजार होता. तर वर्षाचे 63 कोटी 87 लाख 50 हजार रुपये लुटले जातात, असा आरोप आहे. तसेच दुधाचे फॅट मोजण्यासाठी 50 मिली दूध घेतले जाते, हे दूध उत्पादकांना परत दिले जात नाही. त्याचाही आर्थिक फटका उत्पादकांना बसतो आहे. या सर्वांची चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. 

दूध संस्थेमध्ये काम करणारे कामगार अत्यंत तुटपूंज्या वेतनावर काम करत आहेत, त्यांना किमान वेतन मिळावे, बोनस फंड, रजा, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.