Thu, Apr 25, 2019 17:34होमपेज › Kolhapur › महापौरपदासाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल होणार

महापौरपदासाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल होणार

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 12:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी  

कोल्हापूरच्या महापौर व उपमहापौरपदासाठी 25 मे रोजी निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकराला होणार्‍या विशेष बैठकीत महापौर-उपमहापौरपदाची निवड होईल. त्यांतर्गत सोमवारी (21 मे) दुपारी तीन ते पाच या कालावधीत महापालिकेचे नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 

भाजप-ताराराणी आघाडी शांत की वादळापूर्वीची शांतता...

महापालिका प्रशासकीय पातळीवर आणि सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येही महापौर-उपमहापौर निवडणुकीची धामधूम सुरू आहे. परंतु, भाजप-ताराराणी आघाडीच्या पातळीवर अद्यापही हालचाली सुरू नसल्याचे सांगण्यात येते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मुलाखती झाल्या आणि पार्टी मिटिंगही होणार आहे. मात्र, अद्यापही भाजप-ताराराणी आघाडीची पार्टी मिटिंग कधी होणार? हे त्या पक्षाच्या नगरसेवकांनाही माहिती नाही. तूर्तास भाजप-ताराराणी आघाडीच्या पातळीवर महापौर निवडणुकीविषयी शांतता असल्याची चर्चा आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीमधील ठराविक नगरसेवकांशी त्यांचा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरूच आहे.