Fri, Apr 19, 2019 12:34होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षण पाठिंब्यासाठी जिल्ह्यातून रीघ

मराठा आरक्षण पाठिंब्यासाठी जिल्ह्यातून रीघ

Published On: Aug 06 2018 1:52AM | Last Updated: Aug 06 2018 1:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, अशा घोषणा देत, मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी अवघा जिल्हा दसरा चौकात एकवटला. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आबालवृद्धांसह युवक, युवती, महिलाही या आंदोलनात सहभागी झाले. हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर भगवी टोपी परिधान करून विविध तरुण मंडळांनी काढलेल्या दुचाकी रॅलीमुळे दसरा चौक भगवामय झाला.

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सकाळी 9 वाजल्यापासूनच जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून मराठा बांधव दसरा चौकात येत होते. ‘लय झाली चर्चा, आता आरक्षण द्या’, ‘आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही’, अशा घोषणा देत मराठा बांधवांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तरुण मंडळांबरोबरच विविध संस्था, संघटना आणि ग्रामंपचायतींनी आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला. दुपारी दोनच्या सुमारास मराठा समाजातील कणेरीवाडीच्या विनायक गुदगी या युवकाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या केल्याची बातमी कळताच दसरा चौकातील भगवे वादळ शमले. ठिय्या आंदोलनासाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ क्षणात रिकामे झाले. सर्व सकल मराठा बांधवांनी दसरा चौकात रस्त्यावर ठिय्या मांडला.   

बामसेफ संघटना

मराठा आरक्षणास बामसेफ संघटनेच्या वतीनेही  जाहीर पाठिंबा देण्यात आला. वामन मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बामसेफसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संयुक्त जुना बुधवार पेठेचीदुचाकी रॅली

संयुक्त जुना बुधवार पेठेने दुचाकी रॅली काढून मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला. आरक्षण दिले तर कोल्हापूर गुळाची भेट, नाही तर कोल्हापुरी पायताण देऊ, असा संदेश देत कार्यकर्त्यांनी रॅलीद्वारे दिला. रॅलीत गुळाची ढेप आणि कोल्हापूर पायताण आणले होते. यावेळी नगरसेविका सरिता मोरे, अध्यक्ष धनंजय सावंत, दिगंबर फराकटे, नंदकुमार मोरे, अनिल निकम, अमोल डांगे, रणजित शिंदे, सुशील भांदिगरे, अविनाश साळुंखे, उदय भोसले, बंडा आडगुळे, अरुण खोडवे, नागेश घोरपडे, हेमंत साळोखे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्राह्मण युवा मंच : ब्राह्मण युवा मंचने मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी प्रियांका कुलकर्णी, ऐश्‍वर्या मुनीश्‍वर, स्वानंद कुलकर्णी, केदार वाघापूरकर, किरण कुलकर्णी, मयूर तांबे, सुजय कुलकर्णी, संजय कुलकर्णी, केदार कुलकर्णी, महेश उरसाल, नंदकुमार वेठे उपस्थित होते.

बालगोपाल तालीम मंडळ : बालगोपाल तालीम मंडळानेही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. यावेळी युवराज कुरणे, ओंकार साळोखे, राहुल चव्हाण, अजित लटके, धैर्यशील यादव, अजित पवार, सागर बच्चे, सोमनाथ निकम, राजू कुरणे, संजय साळोखे, सुशील चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साळोखे फौंडेशन : शिवाजी पेठेतील साळोखे फौंडेशनच्या वतीने दुचाकी रॅली काढून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक उदय साळोखे, अध्यक्ष अमर साळोखे, अतुल साळोखे, अवधूत साळोखे, युवराज साळोखे, अमित साळोखे, सचिन साळोखे, नवनाथ साळोखे, आशिष साळोखे, महेश साळोखे, सुरेश साळोखे आदी उपस्थित होते.

संयुक्त टेबलाई : येथील प्रगती कॉलनी आणि कलानंद कॉलनीतील नागरिकांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. यावेळी वसीम अत्तार, मतीम मोमीन, इरफान शेख, विशाल शिंदे, पृथ्वी शिंदे, सोहन चौगुले, अक्षय पाटील, रमन जाधव, इर्शाद खान.

कोल्हापूर जिल्हा मेडिकल कामगार संघटना : अध्यक्ष अमर भोमकर, आनंदा पाटील, अमोल कापसे, श्रीकांत माजगावकर, सचिन रुगे, धनाजी गवळी आदी उपस्थित होते.

रमणमळा मित्र मंडळ : सुनील मगदूम, महेश बेडेकर, रवी जानकर, आनंदा बोगडे, जितेंद्र भोसले, निरंजन मगदूम, अनिल अधिक, नीलकंठ जांभळे, केशव चंदूरकर, सचिन सरनाईक, प्रशांत जाधव.

जिल्हा जनरल प्रॅक्टिशन असो. : डॉ. सरदार पाटील, डॉ. मणेर, डॉ. अशोक रणदिवे, डॉ. संजय केटकाळे, डॉ. राजेश पाटील, डॉ. रूपाली  सोमन, डॉ. खाडे. डॉ. व्ही. बी. पाटील.