Wed, Jul 24, 2019 08:01होमपेज › Kolhapur › हरोलीतील विवाहितेची जयसिंगपुरात आत्महत्या

हरोलीतील विवाहितेची जयसिंगपुरात आत्महत्या

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 29 2017 1:15AM

बुकमार्क करा
जयसिंगपूर : प्रतिनिधी

हरोली (ता. शिरोळ) येथील सौ. भारती संजय मगदूम (वय 46) यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी जयसिंगपूर-उदगाव मार्गावरील डी-मार्टसमोर असलेल्या पूजा टाईल्सनजीक आढळला. त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्येचे नेमके कारण  स्पष्ट झालेले नाही.

सौ.  मगदूम  बुधवारी आईला भेटून येतो असे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न परतल्याने पती संजय बाळू मगदूम यांनी पत्नी बेपत्ता असल्याची वर्दी शिरोळ पोलिसांत दिली होती. सौ. मगदूम यांचे उमळवाड माहेर आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळी शहराजवळ असणार्‍या आणि सांगली महामार्गावरील पूजा टाईल्सजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी न्यूऑन कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचे समजते. त्यांच्या पश्‍चात मुलगी, मुलगा, पती असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दुपारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. जयसिंगपूर पोलिसांनी हा गुन्हा शिरोळ पोलिसांकडे वर्ग केला आहे.