Tue, Apr 23, 2019 22:38होमपेज › Kolhapur › दहावीच्या गुणपत्रकांचे 22 रोजी शाळांमध्ये वाटप

दहावीच्या गुणपत्रकांचे 22 रोजी शाळांमध्ये वाटप

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 11 2018 11:14PMकोल्हापूर : प्रतिनिधी

 दहावीच्या मार्च-2018 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेच्या गुणपत्रकांचे वाटप शुक्रवार दि. 22 जून रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर शाळांमध्ये करण्यात येणार आहे. 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार उत्तरपत्रिकांची छायाप्रत मागणी, गुण पडताळणी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता शाळांना तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख तसेच कलचाचणी अहवालाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतरच अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांनी दिली.