Fri, Mar 22, 2019 05:49
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › मराठी नाट्य परिषदेसाठी 4 मार्च रोजी मतदान

मराठी नाट्य परिषदेसाठी 4 मार्च रोजी मतदान

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 1:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवार, (दि.4) मतदान होत असून कोल्हापूर जिल्ह्यातून दोन जागांसाठी तीन जण निवडणूक लढवत आहेत.  कोल्हापूर व इचलकरंजी मधून नाट्य परिषदेचे साडेसातशे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

नाट्यवितरक  आनंद कुलकर्णी, गिरीश महाजन व सीमा जोशी निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या तिघांमध्ये तिहेरी लढत होणार आहे.दरम्यान,  कोल्हापुरातून मी रंगकर्मी म्हणून निवडणूक रिंगणात उतरली आहे, कोल्हापूरच्या रंगकमींसाठी काम करण्याची आपली इच्छा आहे, असे सीमा जोशी यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.  या पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर शाखेच्या संचालक ही नसलेल्यांना कोल्हापूर रंगकर्मींसाठी काहीही काम करण्याची इच्छा नसलेल्यांना मध्यवर्तीत आपला प्रतिनिधी म्हणून पाठवायचेका. नाट्य परिषदेच्या नावावर खोटी आश्‍वासने देऊन सभासद करून घेतले. गेले पंधरा वर्षे यांनी कोल्हापूर नाट्यरसिकांसाठी काय केले. कोल्हापूरच्या रंगकर्मीसाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

दरम्यान, आनंद कुलकर्णी व गिरीश महाजन यांनी कोल्हापुरात विविध नाटकांचे प्रयोग घेऊन कलेच्या परंपरेला चालना देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. मोहन जोशी यांचा आपल्याला जाहीर पाठींबा असल्याने जागृक मतदार आम्हालाच मतदान करतील, असा दावा त्यांनी केला आहे.