Sun, Jul 21, 2019 10:03होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : गडहिंग्लजला मराठा संघटनांचा गनिमी कावा,अचानक रास्ता रोको 

कोल्हापूर : गडहिंग्लजला मराठा संघटनांचा गनिमी कावा,अचानक रास्ता रोको 

Published On: Jul 23 2018 12:58PM | Last Updated: Jul 23 2018 12:58PMगडहिंग्लज : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी गेल्या वर्ष भरापासून राज्यभर आंदोलने केली असून अतिशय शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा काढून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अजूनही याबाबत सरकारने पावले उचलली नसल्याने राज्यभर गनिमी काव्यांने आंदोलने सुरु केली आहेत. 

आज गडहिंग्लजला भारतीय मराठा संघाच्यावतीने प्रांत कार्यलयासमोर गनिमी पध्दतीने रास्ता रोको करून जोरदार घोषणाबाजी केली. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पोलिसांनाही केवळ आंदोलन बघत बसण्याशिवाय काहीही करता आले नाही. या आंदोलनात युवक व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.