Tue, Nov 20, 2018 14:08होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी म्हसवेचे १०० युवक घेणार  जल समाधी 

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी म्हसवेचे १०० युवक घेणार  जल समाधी 

Published On: Aug 07 2018 9:27PM | Last Updated: Aug 07 2018 9:27PMगारगोटी : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्रात जोरदार आंदोलने सुरु आहेत . तसेच आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातील तरूण आत्महत्येचा मर्ग स्विाकरत आहेत. असाच जल समाधीचा इशारा कोल्हापुरातील म्हसवेच्या १०० युवकांनी दिला आहे.  

गेल्या अनेक वर्षे पासून मराठा समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला अरक्षण मिळावे म्हणून आज मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या समाजाच्या गेल्या  १०दिवसापासून  गारगोटी येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे शासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही.

शासन दखल घेत नाही म्हणून एक मराठा लाख मराठा या घोषणे खाली एकवटलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रत सुरू असलेल्या मराठा आरक्षणसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हसवे ता.भुदरगड येथे वेगगंगा नदीत बुधवार दी८/८/२०१८रोजी सकाळी ११ वाजता सुमारे १०० मराठा जल समाधी घेणार आहेत.