Thu, Apr 25, 2019 21:28होमपेज › Kolhapur › दसरा चौकात अवतरले भगवे वादळ...

दसरा चौकात अवतरले भगवे वादळ...

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 06 2018 11:57PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाची धग जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचली असून, गाव बंद पुकारून सरकारचा निषेध नोंदवला जात आहे. गेले तेरा दिवस ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. शांततेत आणि शिस्तबद्धरीत्या सरकारचा अनोख्या पद्धतीने येथे निषेध नोंदविला जात आहे. या ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्हाव्यापी लोकआंदोलन सुरू असून, यांतर्गत ग्रामीण भागाच्या कानाकोपर्‍यातून सर्व जाती-धर्मांचे लोक सहभागी होत आहेत.

समस्त कुशिरे ग्रामस्थ : ग्रामस्थांनी गाव बंद पुकारून दसरा चौकात येऊन ठिय्या मांडला. यामध्ये विष्णू पाटील, भीमराव पाटील, सर्जेराव घोरपडे, संतोष साबळे, धनाजी खुटाळे, दादासाहेब तावडे, वाल्मीक पाटील, अमर तावडे, कृष्णात सुतार, निवास ढोले, सयाजी मिसाळ, अनिल पाटील, शहाजी पोवार, उमेश कुंभार, काकासोा कांबळे आदी उपस्थित होत.पोहाळे तर्फ आळते ग्रामस्थांनी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनास पाठिंबा देत जोरदार घोषणाबाजी केली. 

समस्त भुये ग्रामस्थ : गावात कडकडीत बंद पाळून ग्रामस्थांनी मोर्चाने येऊन दसरा चौकातील ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. सकाळी ग्रामस्थांनी ग्रामदैवत मारुतीला महाआरती करून मराठा आरक्षणाला साकडे घातले. यावेळी माजी सरपंच अभिजित पाटील, सरपंच रमेश कांबळे, उपसरपंच सविता पाटील, अमर पाटील, बाबासाहेब पाटील, विक्रम पाटील, बाजीराव पाटील, धनंजय शिंदे, शामराव पाटील यांच्यासह  सर्व ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळे, महिला बचतगटांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा मातंग समाज संघर्ष कृती समिती : समितीने ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. अशोक भंडारी, अ‍ॅड. दत्ताजी कवाळे, अमर तडाखे, अ‍ॅड. रणजित कवाळे, कुमार दाभाडे, अमोल महापुरे, धनाजी सकट, अनिल अवघडे, उमाजी सनदी, भत्तरत धोंगडे, प्रशांत अवघडे, अनिल कवाळे, अनिल मिसाळ, आदिनाथ साठे, अनिकेत लडाखे, अक्षय साळवी, अशिष पांढरे, रोहित चौधरी, रोहित लोखंडे, सूरज लोखंडे, राजेश जिरगे उपस्थित होते.

काळम्मावाडी धरणग्रस्त संघटना : गुडोपंत पाटील, शामराव झोरे, प्रकाश पाटील, अशोक झंजे, शंकर चव्हाण, पीटर डिसोजा, विठ्ठल पाटील, निवृत्ती पाटील, अशोक पारदे, मारुती पाटील, बाबुराव चव्हाण, बाबुरावजी सावंत, मारुती शिंदे, सुरेश पाटील यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते.

लेटेस्ट तरुण मंडळ : मंडळाने पाठिंबा दिला. यावेळी गजानन यादव, संजय पाटील, प्रवीण फडतारे, राजेंद्र दळवी, अजित पोवार, अविनाश शिंदे, जीवन चोडणकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन ठिय्या आंदोलन केले. 

कोल्हापूर जिल्हा फेरीवाला कृती समिती : आर. के. पोवार, नंदकुमार वळंजू, सुभाष ओरा, अशोक भंडारी, दिलीप पोवार, सुरेश जरग, रघुनाथ कांबळे, महमद शेख, किरण गवळी, राजेंद्र महाडि, सुरेंद्र शहा, समीर नदाफ, अशोक घाटगे, संतोष आळेव आदींनी पाठिंब्याचे पात्र दिले. 

ग्रामपंचायत गिरवाव : संध्या पाटील, प्रल्हाद जाधव, पांडूरंग खेडकर, पांडूरंग पाटील, महेश लोहार, सुरेश पाटील, सचिन पाटील, सचिन पाटील, सरदार जाधव, पांडूरंग सातार्डे, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत शिये : बाजीराव पाटील,मनिषा जाधव, सर्जेराव पाटील, दत्तात्रय आडवे, पांडूरंग पाटील, निवास पाटील, जयसिंग काशिद, किरण यशवंत, बाबुराव पाटील, जयसिंग पाटील, विकास चौगले, अशोक शिंदे, शहाजी काशिद, हनमंत पाटील, बाळकृष्ण जाधव यांच्यासह ग्रामस्थ, तरूण मंडळे रॅलीने ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आली होती. 

प्रहार अपंग क्रांती आंदोलन, चंद्रकांत पाटील कला,क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक युवा मंच केर्ले, पाटाकडील तालीम मंडळ, समस्त राजारामपूरी मधील सर्व तरूण मडळे ग्रामस्थ, ग्रामपंचायत नेर्ले, कोल्हापूर जिल्हा फेरीवाला कृती समिती, ग्रामपंचायत सडोली खा, राधाकृष्ण सत्कार्य मंडळ, ग्रामपंचायत पोहाळे तर्फ आळते, ग्रामपंचायत कुशिरे, ठाणे यांच्यासह जिल्ह्यातील सामाजिक संस्था, तरूण मंडळे, महिला बचत गट,आजी-माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.