Wed, Sep 19, 2018 10:33



होमपेज › Kolhapur › अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून  

अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून  

Published On: May 31 2018 10:38PM | Last Updated: May 31 2018 10:38PM



कुरुंदवाड (जि. कोल्‍हापूर): प्रतिनिधी

शिरढोण (ता. शिरोळ) येथे भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून डोक्यात रॉड घालून एकाचा खून करण्यात आल्‍याची घटना समोर आली आहे. भुपाल गुंडू नारगुडे (वय.65) असे खून झालेल्‍याचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता सुमारास झाल्‍याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

या प्रकरणी रामा शंकर शहापुरे, आप्पासो शंकर शहापुरे, बाळया उर्फ सचिन आप्पासो शहापुरे, संदीप आप्पासो शहापुरे (सर्व रा. शिरढोण) या चौघांना कुरूंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.