Wed, Jun 26, 2019 23:29होमपेज › Kolhapur › नऊ कोटींच्या 'युवराज'चा दरारा (Video)

नऊ कोटींच्या 'युवराज'चा दरारा (Video)

Published On: Jan 29 2018 9:39PM | Last Updated: Jan 29 2018 9:39PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

भिमा कृषी प्रदर्शनात यंदा जगभर प्रसिद्धी मिळवलेला हरियाणाचा 'युवराज' नावाचा रेडा आकर्षण ठरला आहे. कर्नालच्या एका कार्यक्रमात युवराजची किंमत ९ कोटी ३५ लाख करण्यात आली होती. पण, युवराजचे मालक करमवीर यांनी त्याला विकले नाही.  

हरियाणातील  कुरुक्षेत्र मध्ये राहणार्‍या  श्री करमवीर यांचा हा युवराज आहे. युवराजची लांबी ९ फूट आणि ऊंची ५ फूट ९ इंच इतकी आहे. युवराज सध्या ८ वर्षांचा असून, त्याचे वजन १५०० किलो आहे. युवराजच्या वीर्यला खूप मागणी आहे. हे वीर्य खरेदी करण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. एकवेळच्या विर्यातून साधारण  ५०० ते ७००  डोस बनवले जातात. यातील एक डोस  ३०० रुपयांला विकला जातो.  चार वर्षांत युवराजने दीड लाखांहून अधिक पिलांना जन्म दिला आहे. या जन्मलेल्या पिल्लांच्या खरेदीसाठी  अडीज लाख  रुपये किंमत मोजावी लागते.  युवराजपासून झालेल्या म्हैशी शरीराने मजबूत, दुधाची गुणवत्तेबरोबरच साधारण १८ ते २० लिटर दूध देतात.