Wed, Nov 13, 2019 13:08होमपेज › Kolhapur › नुकसानीची भरपाई मनसेने द्यावी : अशोक चव्हाण

नुकसानीची भरपाई मनसेने द्यावी : अशोक चव्हाण

Published On: Dec 01 2017 12:58PM | Last Updated: Dec 01 2017 12:58PM

बुकमार्क करा

कोल्‍हापूर : प्रतिनिधी

काँग्रेस कार्यालयावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे.पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई केली पाहिजे, जे नुकसान झाले ते मनसेने दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कोल्हापुरात व्यक्त केली. असे प्रकार लोकशाहीला मारक आहेत. संजय निरुपम यांनी फेरीवाल्याबाबत भूमिका घेतली आहे. तशी मनसेचीही भूमिका आहे. प्रत्येकाची वैचारिक भूमिका असते, ती त्यांनी मांडली पाहिजेत, मात्र ती हिंसक असू नये ते लोकशाहीला मारक आहे असेही त्यांनी सांगितले.