Tue, Jan 22, 2019 06:29होमपेज › Kolhapur › माऊली जमदाडे  ‘महान भारत केसरी’चा मानकरी

माऊली जमदाडे  ‘महान भारत केसरी’चा मानकरी

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 12:49AM

बुकमार्क करा

बेळगाव :

कोल्हापूरच्या माऊली जमदाडे या पैलवानाने कर्नाटक राज्यात कुस्ती जिंकली. पंजाबचा मल्ल अमित सरोहा याला घिस्सा डावावर चितपट करून माऊलीने महान भारत केसरी किताब पटकावला आहे. माऊली याला 2 लाख रुपयांचे पारितोषिक आणि चांदीची गदा प्रदान करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यातल्या जमखंडीमध्ये माऊली जमदाडे या पैलवानाने विजयी पताका फडकावली आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या जमखंडीमध्ये महान भारत केसरी स्पर्धा पार पडली. त्यामध्ये कोल्हापूरच्या गंगावेश तालमीच्या माऊली जमदाडे याने महान भारत केसरीचा किताब पटकावला. भारतीय कुस्ती संघाच्या वतीने जमखंडीमध्ये ही कुस्तीची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी देशभरातले नामांकित मल्लही आले होते. त्यात पंजाब राज्याचा मल्ल अमित सरोहा याला घिस्सा डावावर चितपट करून कोल्हापूरच्या माऊलीने कुस्ती जिंकली.

विजेता माऊली याला 2 लाख रुपयांचे पारितोषिक आणि चांदीची गदा प्रदान करण्यात आली आहे. या कुस्तीनंतर गंगावेश तालमीच्या सगळ्याच पैलवानांनी माऊली याचं जोरदार स्वागत केलं.
विशेष म्हणजे गेल्या वर्षीही जमखंडीच्या मैदानावर महान भारत केसरीचा मान हा याच गंगावेश तालमीच्या योगेश बोंबाळे याने मिळवला होता. त्यानंतर यंदाही कोल्हापूरच्या या पैलनानाने कर्नाटक राज्यात आपल्या कुस्तीचे प्रदर्शन करत तेथील मैदान मारले.