Wed, Nov 14, 2018 01:40होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिर परिसराचे रूपडे लवकरच खुलणार

अंबाबाई मंदिर परिसराचे रूपडे लवकरच खुलणार

Published On: Jan 31 2018 2:03AM | Last Updated: Jan 31 2018 1:21AMकोल्हापूर : प्रिया सरीकर

गेली अनेक वर्षे शासनदरबारी अडकून पडलेल्या श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे बुधवारी (दि. 31) मुंबईमध्ये मा. मुख्यमंत्री यांच्यासमोर सादरीकरण होत आहे. यामध्ये आराखड्यातील पहिल्या टप्प्याचा निधी मंजूर होईल, अशी आशा आहे. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने दर्शन मंडप, वाहनतळ आणि भक्‍त निवासचे काम मार्गी लावले जाणार आहे. 

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याला लवकरच मुहूर्त लागणार आहे. बुधवारी (दि. 31) मुंबई येथे आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत अंतिम बैठक होणार असून, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला अंतिम मंजुरी मिळणार आहे.  एकूण 250 कोटींच्या तीर्थक्षेत्र आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी 65 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील कामे ही पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवून केली जाणार आहेत. गतवर्षी दसर्‍याच्या मुहुर्तावर तीर्थक्षेत्र आराखड्याचे काम सुरू होणार होते; पण झाले नाही. आता नव्या वर्षातील गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर तरी आराखड्याचे काम सुरू होईल, अशी आशा कोल्हापूरकरांना लागून राहिली आहे.
Image may contain: text