Sat, Sep 22, 2018 06:57होमपेज › Kolhapur › मटक्यासाठी माणसे नेमणार्‍यांनी नैतिकता शिकवू नये

मटक्यासाठी माणसे नेमणार्‍यांनी नैतिकता शिकवू नये

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

गृह राज्यमंत्री असताना मटका घेण्यासाठी माणसे नेमणार्‍या आणि अजिंक्यतारावर पोत्याने मटक्याच्या चिठ्ठ्या आणणार्‍या सतेज पाटील यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, असा पलटवार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केला आहे. कोल्हापूर शहराला एक वर्षात पाणी देण्याची घोषणा याच पाटील यांनी केली होती. मात्र, चार वर्षे झाली तरी पाणी मिळालेले नसून नागरिकांची फसवणूक झाली आहे. या फसवणुकीबद्दल पाटील यांच्यावरच दोन हजार कोटींचा दावा ठोकणार असल्याचे महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाडिक म्हणाले, आ. पाटील यांना मी राजकारणात आणले. दिग्विजय खानविलकर यांच्यासारख्या चांगल्या माणसाला पाडून पाटील यांना निवडून आणले. खानविलकर यांना पाडल्याचा आज पश्‍चाताप होत आहे. पाटील यांना ज्यांनी मदत केली, त्या सर्वांवर त्यांनी बेवड केला आहे. म्हणूनच त्यांची ‘गोकुळ’मधून आम्ही हकालपट्टी केली. मंत्री असताना त्यांनी शेतकरी व उद्योग-व्यावसायिकांना खूप त्रास दिला. मंत्री असतानाच त्यांनी आयआरबीला कोल्हापुरात आणले. नागरिकांचा विरोध असतानाही त्यांनी पावती फाडून आयआरबीच्या तुकड्याची परतफेड केली. मंत्रिपदाच्या काळात त्यांनी केलेल्या कारनाम्याने जनता भडकली होती. म्हणूनच विधानसभेला त्यांना पराभूत व्हावे लागले, असे महाडिक यांनी सांगितले.