कोल्हापूर : प्रतिनिधी
दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने कस्तुरी क्लब सभासदांना नेहमीच नवनवीन गोष्टींचे प्रशिक्षण आणि अनुभव देण्याचा प्रयत्न केला जातो. कस्तुरी क्लबने नुकतीच इटालियन स्पाईसी रेसिपी शिकण्याची संधी सभासदांना दिली. दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आणि हॉटेल केट्री यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. सध्या इटालियन फूडची चलती आहे. अशात घरोघरी तरुण पिढी पिझ्झा आणि पास्ता खाणे पसंद करते. याच इटालियन डिशेस आपण घरच्या घरी बनवू शकलो तर त्याची लज्जत सर्व कुटुंब चाखू शकेल. केवळ याच विचारांनी कस्तुरी सभासदांसाठी इटालियन रेसपी वर्कशॉपचे आयोजन केले होते. यावेळी सभासदांना मार्गारिटा पिझ्झा, सिगा रोल, क्रिमी पास्ता, हवाईओन सलाड, स्पॅगेटी पास्ता इन रेड सॉस, इटालियन ब्रुशेट आदी इटालियन डिशेस कशा बनवायच्या, याचे प्रशिक्षण हॉटेल केट्रीतर्फे देण्यात आले. रेसिपीमधील सर्व बारकावे आणि टिप्स दिल्याने सभासदांत उत्साह होता. लवकरच सिझलर व सूप वर्कशॉपचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- 8805007724.