होमपेज › Kolhapur › माधुरी शिंदे खून प्रकरण: सूर्यकांत शिंदे, प्रमोद पाटील व संतोष मानेला पोलीस कोठडी    

माधुरी शिंदे खून प्रकरण: सूर्यकांत शिंदे, प्रमोद पाटील व संतोष मानेला पोलीस कोठडी    

Published On: Jun 24 2018 8:34PM | Last Updated: Jun 24 2018 8:33PMजयसिंगपूर: प्रतिनिधी

माधुरी शिंदे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी, पती सूर्यकांत महादेव शिंदे याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ जुलैपर्यंत आठ दिवसाची पोलिस कोठडीचा आदेश दिला. या प्रकरणात छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद सुरेश पाटील यांना अटक झाल्याने माधुरी शिंदे खून प्रकरण आता पती-पत्नीतील वाद, घटस्फोट, अनैतिक संबंध, वादातून बदला आणि कट कारस्थान इथेपर्यंत पोहोचले आहे.

दरम्यान या प्रकरणाचा नि:पक्षपातीपणे चौकशी होऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जयसिंगपूर येथे दुपारी केली. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी त्यांनी ही मागणी केली आहे.

दरम्यान शिंदे यांच्या फिर्यादीनुसार शनिवारी रात्री अटक केलेल्या छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद सुरेश पाटील व घटनास्थळी हजर असलेला संतोष माने-घालवाडे या दोघांना कुरुंदवाडचे प्रथमवर्ग न्यायाधीश आर. ए. माळा कोळीकर (पाठक) यांनी सहा दिवसांची म्हणजे ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील यांना अटक केल्याने या प्रकरणात त्यांचा हात आहे का ? याची चर्चा आज शिरोळ तालुक्यात रंगली. त्यांच्या अटकेने मात्र छत्रपती ग्रुपला चांगलाच धक्का बसला आहे.

तिघांनाही कुरूंदवाड न्यायालयात हजर करताना कुरुंदवाड येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. जुने एसटी स्‍टँड परिसर पोलिस ठाणे परिसर व नायरने रस्ता रस्त्यांची नाकाबंदी पोलिसांनी केली होती. छत्रपती ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने कुरुंदवाडमध्ये तणावपूर्ण शांतता होती. माधुरी शिंदे यांच्या खुनाच्या घटनेनंतर जयसिंगपूर पोलिसांनी जयसिंगपूर व कुरुंदवाड येथे मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

तृप्ती देसाई यांनी याप्रकरणी सूर्यकांत शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. माधुरी शिंदे यांनी यापूर्वी पोलिस ठाण्याकडे दिलेल्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली नसल्यानेच खुनाची घटना घडली असा आरोप त्याने पोलिसांवर केला. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसते असे त्या म्हणाल्या.
खून प्रकरणातील फिर्यादी माधुरी शिंदे यांची मुलगी रेवा शिंदे यावेळी म्हणाली, दीड वर्षांपूर्वी वडील सूर्यकांत शिंदे यांनी आईच्या डोक्यात पहार घातले होते त्या घटनेचा मी व संतोष माने साक्षीदार असल्याने माने यांच्या विरोधात वडिलानी फिर्याद दिल्याचा आरोप  रेवाने केला.