Tue, Feb 19, 2019 08:01होमपेज › Kolhapur › माधुरी शिंदे खून प्रकरण : प्रमोद पाटील, संतोष मानेला अटक

माधुरी शिंदे खून प्रकरण : प्रमोद पाटील, संतोष मानेला अटक

Published On: Jun 24 2018 12:58AM | Last Updated: Jun 24 2018 1:04AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी माधुरी शिंदे यांच्या खुनाला रात्री वेगळी कलाटणी मिळाली. संशयित आरोपी पती सूर्यकांत शिंदे यांच्या फिर्यादीनंतर छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील व संतोष माने यांना रात्री उशिरा जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली.

पत्नी माधुरी शिंदे व संतोष माने यांचे शारीरिक संबंध सुरू असताना मी दरवाजाच्या फटीतून पाहिले. मी माधुरीला दार उघडण्यास सांगितले असता तिने दार उघडून, अर्वाच्य शिवीगाळ केली. त्यावेळी आत असलेल्या संतोष माने याने  शिवीगाळ करून व हातात कुऱ्हाड घेऊन  घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मानेवर मारलेला वार चुकवून मी लपून बसलो. त्यावेळी माने याने बाहेर ये, तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत कालच प्रमोददादांनी तुला कायमचे संपवण्यासाठी सांगितले आहे. तू नेहमीच माझे, प्रमोददादांचे  व माधुरीच्या संबधात येतोस तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून धमकी दिल्याची फिर्याद दिली आहे.

वाचा ►कोल्‍हापूर : भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी माधुरी शिंदे यांची पतीकडून हत्या

त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी प्रमोद पाटील व संतोष माने यांच्यावर अटकेची कारवाई केली.त्यामुळे माधुरी शिंदे खून प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.