Wed, Oct 16, 2019 17:26होमपेज › Kolhapur › कोल्हापूर; गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांची जुगलबंदी(Video)

कोल्हापूर; गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांची जुगलबंदी(Video)

Published On: Sep 12 2019 9:20AM | Last Updated: Sep 13 2019 11:36AM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

दहा दिवसांपूर्वी वाजत-गाजत प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या लाडक्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

कोल्हापूरच्या पहिल्या मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाची मिरवणूक मोठ्या थाटात काढण्यात आली आहे. 

पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेरच असल्याने गणेशमूर्तींचे विसर्जन इराणी खणीमध्ये करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी उतरण्यासही वेग आला आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी शुक्रवार पेठेतून ब्रम्हपुरी जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. याठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी तराफे उपलब्ध करण्यात आले आहेत. इराणी खण, कोटीतीर्थ तलाव, राजाराम तलाव व राजाराम बंधारा याठिकाणी विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

पूरस्थितीमुळे पंचगंगा घाट पाण्याखाली असल्याने विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाची कसरत होत होती. मात्र बुधवारपासून पुराचे पाणी ओसरू लागले आहे. सायंकाळी कै. संजय गायकवाड यांच्या पुतळ्यासमोरील मार्गावरील पाणी मागे सरकल्याने ब्रम्हपुरीकडे जाणारा रस्ता खुला झाला. यामुळे पंचगंगा नदी घाटावर तराफ्यांच्या माध्यमातून विसर्जन करता येईल, अशी आशा आहे.

कोल्हापूर; गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांची जुगलबंदी