Mon, Jul 22, 2019 03:02होमपेज › Kolhapur › LIVE : दूध बंद आंदोलन सुरु, ठिकठिकाणी हिंसक वळण 

LIVE : दूध आंदोलनात पाणी ; सदाभाऊ खोत

Published On: Jul 16 2018 7:58AM | Last Updated: Jul 16 2018 4:29PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

दुधाला प्रति लिटर ५ रूपये भाववाढ मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी ( 15 जुलै ) रात्री १२ वाजल्‍यापासून दुधाचे आंदोलन सुरू केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवून ते रस्‍त्‍यावर ओतून दिले जात आहेत.  खा. राजू शेट्टी यांनी रविवारी रात्री बारानंतर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरून दूध बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर कृषीराज्‍यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

हे आंदोन आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत आहे. तसेच आंदोलनादरम्‍यान जे दूध रस्‍त्‍यावर ओतले जात आहे त्‍या दुधात पाणी असल्‍याचा गंभीर आरोप मंत्री खोत यांनी केला आहे. 
 

वाचा :  सरकारने दूध आंदोलन दडपण्याचा नाद सोडावा ; राजू शेट्टी

वाचा :  दूध आंदोलन सरकारला अडचणीत आणण्यासाठी ; सुभाष देशमुख

वाचा : थट्टा करणार्‍या सरकारला ताकद दाखवू राजू शेट्टी

Live Updates :

मिरज तालुक्यात दूध संकलन ठप्प 

मिरज तालुक्यात दूध दर वाढ मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनास दूध संस्थाचाही पाठिंबा मिळाला. मिरज तालुक्यात गोकुळ आणि वारणा दूध संघा मार्फत सुमारे दीड लाख लिटर दूधाचे संकलन केले जाते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दूध संकलन बंद ठेवण्यात आले होते. दूध वाहतूक झाली नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
 

*सांगली : आरवडेत राधाकृष्णाला घातला दुधाचा अभिषेक, बस्तवडेत वारकऱ्यांना दूध वाटप करून केला निषेध

सांगलीच्या दुष्काळी भागाला दूध आंदोलनाचा फटका 

दूध बंद आंदोलनचा सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. याचबोरबर जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे दूध संकलन असलेला देव दूध अर्थात आटपाडीच्या  बाबासाहेब देशमुख दूध संघाला सर्वात मोठा फटका बसला आहे. या संघाचे आटपाडीत (दूध संकलन ३५ हजार लिटर्स), विट्यात (१३ हजार लिटर्स) आणि जतमध्ये (२८ हजार लिटर्स) असे एकूण मिळून ७६ हजार लिटर्स दूध आज संकलन केले गेले नाही.

कराड : स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी स्वाभिमानिचा दुग्धाभिषेक

कराड : प्रतिनिधी 
कराड (जि. सातारा) येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या येथील समाधीस्थळी अभिवादन करत सोमवारी दुपारी दुग्धाभिषेक घातला. तसेच या शेतकरी विरोधी सरकारला सुबुद्धी देण्याची विनंती  स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, कामगार नेते अनिल घराळ यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी कराडात प्रीतिसंगम घाटावर ग्रामदैवत कृष्णामाई आणि महादेव मंदिरात दुधाचा अभिषेक घातला. त्यानंतर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात जात दुग्धाभिषेक घातला.

पुणे : सोमेश्वरनगरमध्‍ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दूध आंदोलन

सोमेश्वरनगर : वार्ताहर

सोमेश्वरनगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे  निरा बारामती रस्त्यावर करंजेपुल येथे  रास्ता रोखो आंदोलन करून दुधाला रास्ता भाव देण्याची मागणी करण्यात आली

सोमेश्वर परिसरात आज दिनांन१६,  सोमवारी  सकाळपासूनच संततधार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पावसातच शेतकऱ्यांनी निरा रस्त्यावर टिय्या मांडत दूध दराबाबत आंदोलन केले. या आंदोलनामुळे निरा बारामती रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 

 

देऊळगावराजेत दूध संकलन बंद

देऊळगाव राजे (जि. पुणे) : वार्ताहर 

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे व परिसरातील सहकारी खाजगी दूध केंद्र चालकांनी  दूध संकलन बंद ठेऊन व दुध उत्पादकांनीही दूध डेअरीला दूध न घालण्याचा निर्णय घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.  आंदोलनाचा तोडगा निघत नाही तोपर्यंत असाच पाठिंबा देण्याचा निर्णय दूध उत्पादकांनी घेतला आहे.

पुणे :  खासदार सुप्रिया सुळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली  राष्‍ट्रवादीचे दूध आंदोलन

राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधाला दरवाढ मिळाली पाहिजे या मागणीसाठी भर पावसात हॉर्न वाजून आंदोलन करण्यात आले 
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

पंढरपूर तालुक्यात दूध दर आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूर : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या दूध दर आंदोलनास पंढरपूर तालुक्यासह सांगोला, मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गावोगावीच्या दूध संकलन सोसायट्या बंद  राहिल्या आहेत. जिल्हा दूध संघाचे संकलनही पूर्णपणे ठप्प झाले आहे. 

दूध आंदोलन पेटले, शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर फेकले 

बोर दहेगाव : प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यातील शेतकरी संघटना आणि शतेकर्‍यांनी पुकारलेल्या संप आक्रमक स्वरूप धारण करताना दिसत आहे. प्रतिलीतर, ५रुपये प्रमाणे दुधाला अनुदान द्यावे आणि व दुधाला भाव हा प्रतिलिटर ३५ रुपये देण्यात यावा. शेतकरी व शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करील आणि १६ जुलैच्या मध्यरात्रीपासून शेतकरी बेमुदत दूध विक्री बंद करणार असल्याचे निवेदन वैजापूर तहसीलदार यांना तालुक्यातील शेतकरी आणि  शेतकरी सघटना आणि यांनी दिले होते.

या आंदोलनाची तीव्रता ही १५ जुलैच्या रात्रीला तालुक्यातील हाडस पिंपळगाव येथे पाहण्यास मिळाली. या ठिकाणी नागपूर, मुंबई,  महामार्गावर शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी दुधाची वाहने अडवून गाडीतील दूध पिशव्या भरलेले कॅरेट महामार्गावर फेकून दूध बंद आंदोलनाला सुरूवात केली. 

नागपूर मुंबई महामार्गावर  पिंपळगाव येथे दूधाचे भरलेले ३० ते ४० कॅरेट दूध अस्तव्यस्त फेकून कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. एकीकडे वैजापूर तालुक्यात दूध विक्री बंद आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटना आणि शेतकरी यांनी दिलेला असताना आणि शेतीमालाला योग्य भाव नसल्याने आणि बोडाळीचे अनुदान अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या दुधाला योग्य भाव व अनुदान मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्त्यांनी सांगितले.

मळोली (ता. माळशिरस) येथे दूध दर, आंदोलन 

मळोली येथे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मालोलीचे ग्रामदैवत असलेल्‍या शंभू महादेवाच्या पिंडीस दुग्धाभिषेक घालून सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला. मळोलीमध्ये सुमारे एका दिवसात सरासरी १५ हजार लिटर दूध उत्पादन होत  असून आजच्या या संपामुळे शेतकऱ्यांचे आजच्या दिवसाचे सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. मळोलीमध्ये सुमारे ११ ते १२ संकलन केंद्रे आहेत. आजच्या दिवशी सर्व संकलन बंद करून संप यशस्वी केला. वेळापूर पोलिस स्टेशन यांच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
 

 

पुणे : शिरूर तालुक्यात दूध आंदोलन

निमोणे : वार्ताहर

पुणे जिल्ह्यातील  शिरूर तालुक्यातील निर्वी परिसरात दूध आंदोलनाची धग वाढली. आक्रमक दूध उत्पादकांनी रस्तावर दूध ओतून मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत दूध संकलन केंद्रात दूध घालायचे नाही असा संकल्प केला.

नांदेडमध्ये टँकरमधील दूध रस्‍त्यावर सोडले

नांदेड : प्रतिनिधी

 दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नांदेडमध्येही आंदोलन सुरु केल आहे. दुधाची वाहतूक करणाऱ्या शिवामृत दुधाच्या टँकरला रात्री अडवून वाहनाच्या चालकाला या आंदोलनात सहभागी करत. यावेळी दूध संकलन केलेले दूध रस्त्यावर सोडून सरकारचा निषेध व्यक्त केला. अर्धापूर तालुक्यातील पारडी आणि मालेगावजवळ हे आंदोलन झाले असून दूध दर वाढीसाठी नांदेडमध्ये ही आंदोलन पेटण्याची चिन्‍हे आहेत.

दूध संकलन करणाऱ्या संस्थांनी दूध संकलन करू नये. यासाठी संघटनेच्यावतीने निवेदनसुद्धा देण्यात आली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दूध संकलन आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

त्याच अनुषंगाने नांदेड शहराला होणारा दूध पुरवठा शेतकरी करत नसल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी आपले दूध गोरगरिबांना शाळेतील विद्यार्थ्यांना वाटण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे

भरपावसात बारामतीत दूध आंदोलन 

बारामती : प्रतिनिधी

रात्रीपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाही सोमवारी (दि. १६ ) सकाळी भर पावसात दूध दर आंदोलन तीव्र झाले. कोर्हाळे बुद्रूक येथे रस्त्यावर दूध ओतत शासनाचा निषेध करण्यात आला. लिटरला पाच रुपये दरवाढ दिल्याशिवाय डेअरीपर्यंत दूध जाऊ दिले जाणार नसल्याचा इशारा तरुण शेतकऱ्यांनी दिला. आंदोलन काळात वाहनांचे नुकसान होईल या भितीने डेअरीचालकांनी सोमवारी दूध संकलन केले नाही.

बीड जिल्ह्यात आंदोलनाला सुरवात

बीड : प्रतिनिधी

बीड येथील सोमेश्वराच्या महादेव मंदिरात रात्री १२ वाजता दुधाचा अभिषेक करून या देवेंद्र सरकारला शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान मंजूर करण्याची सदबुद्धी देवो असे साकडे घातले.

यावेळी जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, युवा जिल्हाध्यक्ष राजू गायके, युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, धनंजय मुळे, अर्जुन सोनवणे, भाऊसाहेब घुगे, विकास आगाऊ व शेतकरी उपस्थित होते.

- पंढरपुरात नामदेव पायरीजवळ दुग्‍धाभिषेक

- औरंगाबाद : वरवंड टोलनाक्‍यावर दुधाची नासाडी 

- सांगोल्यात महूद येथे रस्त्यावर दूध ओतून निषेध

- पालघर, अहमदनगर, बुलढाणा, वाघजाळ येथे टँकरमधील दूध रस्‍त्‍यावर ओतले. 

- अमरावतीत दूध टँकर फोडण्याचा प्रयत्न 

- कोल्हापूरात शिरोळमध्ये दूध बंद आंदोलन 

- कोल्‍हापूर : गोकुळ दूध संघाकडून आज दूध संकलन बंद

- वरवंड टोलनाक्यावर टँकरमधील दूध ओतलं

- कोल्‍हापुरातील शिरोळमध्ये दूध बंद आंदोलन सुरु 

- पुण्यात दुधाच्या पाच  गाड्या फोडल्‍या

- अहमदनगर: पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू, दूध संकलन व वाहतूक ठप्प

-  किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते तसेच डॉ अजित नवले यांना दूध उत्पादकांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये यासाठी पोलिसांकडून नोटीस 

 सांगली  दूध बंद आंदोलनाला वाळवा तालुक्यात उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

इस्लामपूर :  वार्ताहर

 दूध बंद आंदोलनाला वाळवा तालुक्यात उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बहुतांशी दूध संस्थांनी संस्था बंद ठेऊन आंदोलनाला पाठींबा दिला.  

आंदोलनामुळे तालुल्यातील सुमारे ३ लाख लिटर दूध संकलन ठप्प झाले आहे. राजारामबापू दूध संघाने तालुक्यातील १ लाख ४० हजार लिटर दूध संकलन केले नाही. 
तुजारपूर फाटा येथे ग्रामस्थांकडून ३ हजार लिटर दूध ताटसरुंना वाटण्यात आले. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर ठिक ठिकानी पोलिस बंदोबस्त तैनात होता.

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्‍यातील दूध संकलन थांबले

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

तालुक्यातील सहकारी आणि खासगी दूध संस्थांचे सुमारे एक लाख लिटर संकलन संपामुळे थांबले. 

सोलापूर जिल्ह्यातून कोल्हापूरकडे जाणारी दूध वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनामुळे ठप्प झाली. दरम्यान, दूध वाहतुकीसाठी अडचण येऊ नये, यासाठी रत्नागिरी-नागपूर मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.


सांगली : दूध आंदोलनाचा विटा तालुक्यातील दूध संघाना फटका 

विटा : प्रतिनिधी 

स्वाभिमानी संघटनेच्या दूध दर वाढ आंदोलनाचा फटका तालुक्यातील दूध संघाना आज बसला. जवळपास सर्व दूध संघांनी आपले दूध संकलन आज बंद ठेवले. 
 यात दूध संघ आणि एकूण दूध संकलन लिटरमध्ये पुढीलप्रमाणे,  विट्यातील मनमंदिर दूध ( १२ हजार लिटर), विराज दूध (एकूण ४० हजार लिटर), लेंगरे येथील प्रतीक दूध (२३हजार लिटर) , अजिंक्य दूध (१० हजार लिटर) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. विराजसह सर्व संघांनी दिघंची. हिवरे आणि अन्य ठिकाणाची संकलन केंद्रेसुद्धा बंद ठेवली आहेत.

 यात सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील सर्वाधिक आणि जिल्ह्यात तीन क्रमांकाचे दूध संकलन असलेला देव दूध अर्थात आटपाडीच्या स्व. श्रीमंत बाबासाहेब देशमुख दूध संघाला सर्वात मोठा फटका बसला आहे. या संघाचे आटपाडी (दूध संकलन ३५ हजार लिटर), विटा (१३ हजार लिटर) आणि जत (२८ हजार लिटर) असे एकूण मिळून संकलन ७६ हजार लिटर दूध आज संकलन केले गेले नाही.

सांगली : मिरज तालुक्यात दूध संकलन ठप्प 

मिरज : प्रतिनिधी 

मिरज तालुक्यात दूध दर वाढ मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंद आंदोलनास दूध संस्थाचाही पाठिंबा मिळाला. मिरज तालुक्यात गोकुळ आणि वारणा दूध संघा मार्फत सुमारे दीड लाख लिटर दूधाचे संकलन केले जाते. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दूध संकलन बंद ठेवण्यात आले होते. दूध वाहतूक झाली नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

सांगली :  आरवडेत राधाकृष्णाला  दुधाचा अभिषेक   

मांजर्डे : वार्ताहर

मांजर्डे (ता .तासगाव ) परिसरात दूध बंद आंदोलनाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला.  आरवडेत हरेकृष्ण मंदिरात राधाकृष्णाला दुधाचा अभिषेक घालून तर बस्तवडेत वारकऱ्यांना दूध वाटप करून केला निषेध करण्यात आला. मांजर्डे गावात दूध रस्त्यावर ओतण्यात आले.  पेड, आरवडे,  बस्तवडे, बलगवडे,  खूजगाव, कौलगे, हातनूर या भागात दूध उत्पादकानी कडकडीत पूर्णपणे बंद ठेवले.

आरवडे येथे सकाळी 10 वाजता हरेकृष्ण मंदिरात आसपासच्या गावातील शेतकरी जमा झाले.  त्यांनी सर्वांनी भगवान राधाकृष्ण यांच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून सरकारला दूध दरवाढीचा निर्णय घेण्याची सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली.