Tue, Jul 16, 2019 23:55होमपेज › Kolhapur › ‘पुढारी ऑनलाईन’मुळे अटल चषक जगभरात

‘पुढारी ऑनलाईन’मुळे अटल चषक जगभरात

Published On: Apr 16 2018 1:12AM | Last Updated: Apr 16 2018 1:12AMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

मैदानातील खेळाबरोबरच ‘पुढारी लाईव्ह’ची चर्चा रंगली होती. पुढारी ऑनलाईनच्या टीमने अटल चषक स्पर्धेतील सर्व सामने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जगभरात पोहोचवले. कोल्हारपूरच्या  फुटबॉल प्रेमींना हे सर्व सामने पुढारी ऑनलाईन पहाता आले. अटल चषक स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचे व्हिडिओ www.pudhari.news या ‘पुढारी’च्या वेबसाईटवर उपल्बध आहेत. स्पर्धेचे लाईव्ह कव्हरेज भारताबाहेर वास्तव्याला असलेल्या कोल्हापूरकरांनी आवर्जन पाहिले. पीटीएम आणि प्रॅक्टिस यांच्यात झालेला चुरशीचा अंतिम सामना कॅनडामधून पाहणार्‍या निखिल शिंदे यांनी फेसबुक लाईव्हच्या मशध्यमातून कोल्हापूरची फुटबॉलची परंपरा जगभारत पोहोचवल्याबद्दल ‘पुढारी’चे आभार मानले आहेत. सोयम इंगवलेने ‘जगात भारी पुढारी’ अशी कमेंट करत पुढारी ऑनलाईनचा उत्साह वाढवला. याचबरोबर अमित पाटील आणि आरिफ भातरी यांनी दुबईवरून या सामन्याचा आस्वाद घेतला. त्यांनीही दै. ‘पुढारी’चे आभार मानले.

 

Tags : atalfootball2018, Football Tournament, Patakadil Talim A, Practic Football Club A, Final Match, Shahu Stadium, kolhapur,live coverage, appreciated by abroad viewers