Sun, Mar 24, 2019 07:01होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात २० पासून विभागीय साहित्य संमेलन

कोल्हापुरात २० पासून विभागीय साहित्य संमेलन

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 11:45PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

करवीर नगर वाचन मंदिर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीने 20 आणि 21 जानेवारीअखेर विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल परिसरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये हे संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य संमेलन समितीच्या प्रमुख डॉ. सौ. संजीवनी तोफखाने यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी पाच वाजता मराठी विश्‍वकोष महामंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थान डॉ. ल.रा.नसिराबादकर हे भूषविणार आहेत. यावेळी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र गोळे, मनस्विनी प्रभुणे हे उपस्थित राहणार आहेत. रविवारी पहिल्या सत्रात स.9 ते 10 या वेळेत कादंबरी वाचन आणि मुलाखत, नाशिक येथील लेखक सुनील पाटील यांची डॉ. आशुतोष देशपांडे हे मुलाखत घेणार आहेत. दुसर्‍या सत्रात सकाळी 10 ते 11 या वेळेत सामाजिक जीवनात ग्रंथालयाचे स्थान या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादात डॉ. सौ. ज्योस्ना कोल्हटकर या सहभागी होणार आहेत. अध्यक्षस्थान डॉ. प्रकाश कल्‍लोळी हे भूषवणार आहेत. तसेच ग्रंथालये आणि आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर डॉ. एस.ए.एन.इनामदार यांचे व्याख्यान होणार आहे. परिसरातील साहित्यिक व साहित्य संस्था या विषयावर डॉ. पी.जी.कुलकर्णी आणि प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. श्रीमती रजनी हिरळीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी दुपारी 2 ते 4 या वेळेत कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. समारोप समारंभ स्वामी विद्या नृसिंह सरस्वती यांच्या उपस्थित होणार आहे.