होमपेज › Kolhapur › जाणून घ्या : लिंगायत समाजाच्या महामोर्चाची नियमावली

जाणून घ्या : लिंगायत समाजाच्या महामोर्चाची नियमावली

Published On: Jan 23 2018 5:32PM | Last Updated: Jan 23 2018 7:56PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

लातूर, सांगली, कर्नाटकसह आता कोल्हापूरात लिंगायत समाजाकडून विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला प. पू. शिवलिंग शिवाचार्य, अहमदपूरकर महाराज, प. पू. कोरणेश्वर स्वामीजी, बसवलिंग पट्टदेवस, जयदेव मरुघराजेंद्र महास्वामी यांची प्रमुख उपस्‍थिती असणार आहे. यामुळे समाजातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. कोल्‍हापूर येथे दि. २८ रोजी लिंगायत समाजाचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, त्यानिमित्ताने आयोजकांकडून मोर्चासाठी नियमावली तयारी करण्यात आली आहे. 

लिंगायत समाजाकडून काढण्यात येणार्‍या विराट मोर्चाकडून शहरातील जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून आयोजकांकडून काळजी घेण्यात आली आहे. यासाठी लिंगायत महामोर्चा आयोजकांकडून नियमावली तयार करण्यात आली असून ही नियमावली मोर्चातील प्रत्येकासाठी बंधनकारक करण्यात आली आहे.

* या मोर्चामध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येकाला पाण्याची अल्पोपहाराची  व्यवस्था व वैयक्‍तिरित्या करण्यास सांगण्यात आली आहे .

* आयोजकांनी नेमून दिलेल्या पार्किंगच्याच ठिकाणी वाहने लावण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी आयोजकांकडून स्‍वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.

* सहभागी नागरिकांना आरोग्याची कोणतीही समस्या जाणवल्यास  स्वयंसेवकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

* शहरात मोठ्या संख्येने नागरिक येणार असल्याने कचरा होण्याची शक्यता आहे. यासाठी कचरा कुठेही न टाकण्याच्या सूचना व कचरा कचराकुंडीतच टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

* सहभागी नागरिकांसोबत लहान मुले, वयस्कर नागरिक असतील तर युवकांनी त्यांची काळजी  घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

* लिंगायत मोर्चामध्ये सहभागी नागरिकांना वेळोवेळी करण्यात येणार्‍या सूचनांचे पालन करण्यासंदर्भातही सांगण्यात आले आहे.

* या लिंगायत मोर्चामध्ये सहभागी नागरिकांनी मोर्चा संपल्यानंतर प्लास्टाकिच्या बाटल्या, कॅरिबॅग, कागदाचे गोळे, व इतरत पडलेला कचरा गोळा करून कचरा कुंडीत टाकून देण्यात यावा अशी सूचनाही देण्यात आल्या आहेत.