Mon, Feb 18, 2019 07:27होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूरातील महामोर्चात बसवण्णांचेही दर्शन

कोल्‍हापूरातील महामोर्चात बसवण्णांचेही दर्शन

Published On: Jan 28 2018 3:32PM | Last Updated: Jan 28 2018 3:32PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

लिंगायत धमसमाजाला स्‍वतंत्र धर्माची मान्‍यता मिळावी यासाठी अखिल भारतीय लिंगायत समाजातर्फे राज्यव्‍यापी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा शांततेच्या मार्गाने पुकारण्यात आला. लिंगायत धर्माचा समाजवादी प्रेरक विचार देणारे बसवण्णांचे दर्शनही या मोर्चात नागरिकांना झाले. 

या मोर्चात अक्‍कमादेवी, बसवेश्वर आणि चन्‍न बसवेश्वर यांचा वेशभूषा करून बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी त्यांनी परिधान केलेली बसवण्णा यांची वेशभूषा सगळ्यांच्या चर्चेचा विषय होता. आयोजकांतर्फे त्‍यांना मंचावर स्‍थान देण्यात आले होते.